घरमहाराष्ट्रशरद पवारांनी मंदिरात प्रवेश न करता घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन, 'हे' आहे...

शरद पवारांनी मंदिरात प्रवेश न करता घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन, ‘हे’ आहे कारण

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) नास्तिक असून ते मंदिरामद्ये जात नाहीत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यावरून वाद झाला होता. यानंतर शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (dagdusheth ganpati) परिसरादमध्ये पोहोचले. यावेळी मंदिर विश्वस्तांनी पवारांचे स्वगात केले. मात्र शरद पवार यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला नाही. यासंदर्भाती एक खास कारणाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे.

शरद पवार यांनी घेतले बाहेरून दर्शन –

- Advertisement -

शरद पवार (sharad pawar) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भिडे वाडयाची बाहेरून पाहणी केली. यानंतर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (dagdusheth ganpati) मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. मात्र, शरद पवार (sharad pawar) मंदारात न जाता बाहेरून दर्शन घेऊन पुढे रवाना झाले. शरद पवारांचा या ठिकाणी श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती (dagdusheth ganpati) ट्रस्टच्या विश्वस्तांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

प्रशांत जगताप यांनी सांगितले कारण – 

- Advertisement -

शरद पवार (sharad pawar) यांनी मंदिरामध्ये का गेले नाहीत?, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. शरद पवार यांनी मांसाहारी जेवण केल्याने ते मंदिरामध्ये गेले नाहीत. चुकीचा पायंडा पडता कामा नये, असे त्यांनी मला सांगितले, असे प्रशांत जगताप म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -