घरताज्या घडामोडीSharad Pawar turns 81 : मोदी शरद पवारांना म्हणाले स्लो डाऊन..., प्रफुल्ल...

Sharad Pawar turns 81 : मोदी शरद पवारांना म्हणाले स्लो डाऊन…, प्रफुल्ल पटेलांनी सांगितला किस्सा

Subscribe

महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता स्थापनेपासून राज्यात नैसर्गित आपत्तीपासून ते अवकाळी पाऊस आणि अनेक प्रकारच्या संकटांना सामना करावा लागतो आहे. महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक असलेले शरद पवार मात्र अनेकदा राज्यातील कानाकोपऱ्यात सातत्याने पोहचल्याचे दिसून येतात. न थकता वयाच्या ८० व्या वर्षातही शरद पवारांच्या दौऱ्याचा वेग पाहूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवाराच्या या दौऱ्यांवर आणि त्यांच्या वयोमानाने चिंता व्यक्त केली होती. तसेच आरोग्याची काळजी घेण्याबाबतची सूचनाही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात दिल्लीत झालेल्या एका भेटीचा किस्सा खुद्द प्रफुल्ल पटेल यांनीच शरद पवारांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत सांगितला.

काही दिवसांपूर्वी मी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवारांच्या दौऱ्याचा वेग पाहून चिंता व्यक्त केली होती. राज्यात नैसर्गिक संकट असो वा कोणती घटना असो शरद पवार त्याठिकाणी पोहचतात यामुळे पंतप्रधानांनी ती चिंता वयोमानाने व्यक्त केली होती. पवार साहेबांचे वय पाहता त्यांना स्लो डाऊन करण्याचा सल्ला मोदींनी दिला होता. तसेच वेगाने होणारे दौरे पाहता तब्येतीची काळजी घ्यावी असेही सांगितले होते. पण त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी मात्र हजरजबाबी असे उत्तर दिले.

- Advertisement -

पवार साहेब हे जनसंपर्काच्या बाबतीत कोणाचेही एेकणार नाहीत. जनसंपर्क हीच त्यांची ऊर्जा आणि टॉनिक आहे. लोकांमध्ये मिसळूनच त्यांना रात्रंदिवस टॉनिक मिळत असते. हे लोकच त्यांची ऊर्जा आहे, असे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींना दिले. त्यामुळे साहेब काही थांबणार नाहीत असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

पवारांपुढे आपणही थकून जातो 

काही दिवसांपूर्वी पवार साहेब हे विदर्भ दौऱ्यावर आले होते. अनेकदा दौऱ्याच्या नियोजित वेळेला मी तयारी करत असे. पण नियोजित वेळेपेक्षाही आधीच पवार साहेब तयार असायचे. पवार साहेबांची स्टाईल पाहता आपणही अनेकदा थकून जातो. पण पवार साहेबांची ऊर्जा मात्र कमी होत नाही, असाही अनुभव त्यांनी सांगितला.

- Advertisement -

sharad pawar turns 81: …तर २०२४ मध्ये देशात शरद पवारांच्या नेतृत्वात पर्यायी सरकार निर्माण होऊ शकते – नवाब मलिक

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -