घरदेश-विदेशशरद पवार, उद्धव ठाकरेंनी स्वीकारले काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेचे निमंत्रण

शरद पवार, उद्धव ठाकरेंनी स्वीकारले काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे निमंत्रण

Subscribe

72 वर्षीय लतिफ शक्करजी बागवान यांचाही सहभाग

काँग्रेससाघे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सुरु आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीच्या हेतूले ही यात्रा काँग्रेस साठी अत्यंत महत्वाची आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर यांनी आज एका शिष्टमंडळासह मातोश्रीवर उद्धव ठाकरे तर सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेस नेते खा.राहूल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, आपणही या यात्रेत सहभागी व्हावे, असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उभय नेत्यांना दिले. दोहोंनीही हे निमंत्रण स्वीकारले असून, शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले.

भारत जोडो यात्रेला देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून, दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतोच आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने (ठाकरे गट) यात्रेत सहभाही होण्यास सहमती दिल्याने त्याचे महत्व अधिक वाढले आहे. खा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री आ. विश्‍वजीत कदम, महाराष्ट्राचे सहप्रभारी बी.एम. संदीप, आ. सुधीर तांबे, आबा दळवी यांचा समावेश होता.

- Advertisement -

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी सोलापुरातील बार्शी तालुक्यातील पांगरी येथे राहणारे 72 वर्षीय लतिफ शक्करजी बागवान हे स्वयंस्फुर्तीने निघाले आहेत. ते उद्यापासून कर्नुल (आंध्र प्रदेश) येथून यात्रेत सहभागी होणार असून आज मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.

- Advertisement -

बागवान व्यवसायाने टेम्पो ड्रायव्हर आहेत. साधारण 1975 पासून ते काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. इंदिरा गांधी यांच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव असून इंदिरा गांधी यांच्याशी ते पत्रव्यवहाराद्वारे संपर्कात होते. इंदिरा गांधी यांनी त्यांना लिहिलेली पत्रे त्यांनी आजही जतन करून ठेवली आहे. बागवान हे आंध्र प्रदेशातील कर्नुल येथून यात्रेत सहभागी होत असून तेथून पुढे आलुरु, मंत्रालयम, अडोनी, रायचुर आदी ठिकाणी होणाऱ्या यात्रेत ते पायी चालत सहभागी होणार आहेत. दिवाळीपर्यंत साधारण 8 दिवस ते या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या यात्रेमध्येही पायी चालत सहभागी होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

 rahul gandhis bharat jodo yatra

माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले की, 72 व्या वयामध्येही भारत जोडो यात्रेमध्ये स्वयंस्फुर्तीने चालत सहभागी होण्याचा बागवान यांचा निर्णय निश्चितच प्रेरणादायी आहे. भारत जोडो यात्रेसमवेत सर्वस्तरातील लोक जुळत आहेत. यातून भावी काळामध्ये परिवर्तन अटळ आहे. लहान, थोर, ज्येष्ठ अशा सर्व स्तरातील लोकांचा पाठिंबा पाहून आमचाही उत्साह वाढला आहे. महाराष्ट्रामध्येही भारत जोडो यात्रा सर्वांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल. बागवान यांना यात्रेसाठी शुभेच्छा देतो, असे सतेज पाटील यांनी सांगितले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही देशाची लोकशाही वाचविण्यासाठी अत्यंत आवश्यक असून त्यात सर्वांनीच सहभागी व्हावे, असं आवाहन बागवान यांनी केले.


हे ही वाचा –  प्रत्येक झोपडपट्टीधारकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा, राज्यपालांची बिल्डर्सना आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -