आशिर्वाद घेण्यासाठी शरद पवारांची भेट : संजय राऊत

गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तरच आम्ही त्यांना राज्यसभेसाठी पाठिंबा देऊ, असा पवित्रा शिवसेनेने घेतला होता.

MP Sanjay Raut criticized the Agneepath scheme

राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत (Shiv sena leader sanjay raut) यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेणे माझ्यासाठी गरजेचे होते असे सांगत राऊत यांनी या भेटीविषयी जास्त भाष्य करण्याचे टाळले. गुरुवारी राऊत राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तरच आम्ही त्यांना राज्यसभेसाठी पाठिंबा देऊ, असा पवित्रा शिवसेनेने घेतला होता. संभाजीराजे यांनी अनुकूलता न दर्शविल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

हेही वाचा – संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं हीच अपेक्षा, संजय राऊतांची प्रतिक्रिया

याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. शरद पवार हे महाराष्ट्राचे, देशाचे उत्तुंग नेतृत्व आहे. महाविकास आघाडी सरकारचे ते आधारस्तंभ आहेत. ते वडीलधारी आहेत. त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांचा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे आम्ही ४२ मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार होतो.

संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावे एवढीच आमची अपेक्षा होती. संभाजीराजेंना राजकीय पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. कारण यापूर्वीही अनेक लोकांनी, तसेच जे राजघराण्यातील आहेत, त्यांनीदेखील राजकीय पक्षात प्रवेश केला असून राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनीही शिवसेनेच्या नावावर निवडणूक लढवावी अशी आमची अपेक्षा होती, असेही राऊत म्हणाले.


हेही वाचा – खासदार संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, संजय पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब