घरमहाराष्ट्रनिवडणुकीची धामधूम संपताच शरद पवार दुष्काळी सोलापूरच्या भेटीला

निवडणुकीची धामधूम संपताच शरद पवार दुष्काळी सोलापूरच्या भेटीला

Subscribe

अजनाळे, येलमार मंगेवाडी गावातील शेतकर्‍यांशी सवांद

राज्यातील निवडणुकीची धामधूम संपताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुष्काळ दौर्‍यावर रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळी मुंबईत मतदान केल्यानंतर पवार थेट सोलापूरला रवाना झाले. त्यांनी काल (मंगळवारी) सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी आणि डाळींबामुळे प्रकाश झोतात आलेले महाराष्ट्र राज्यातील ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अजनाळे येथील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची भेट घेऊन संवाद साधला. तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

पवारांच्या या दौर्‍यात शेकापचे आमदार गणपतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, अजनाळे गावचे सरपंच विजय येलपले, मंगेवाडी गावचे उपसरपंच चंद्रकांत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. पवार यांनी सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावणीतील शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी एका शेतकर्‍याने तक्रार करताना एका चारा छावटीत केवळ पाच जनावरांना प्रवेश देण्यात आल्याचे सांगितले. सरसकट जनावरांना प्रवेश मिळावा, अशी मागणी या शेतकर्‍याने केली.

- Advertisement -

रोज पंधरा किलो चारा मिळतो, मात्र जनावरांना अधिक चारा मिळावा. दोन हजार लिटर दूध संकलन होते. त्या यलमार मंगेवाडी गावात आता दूध संकलन दोनशे लिटरवर आले आहे, अशी स्थिती गावकर्‍यांनी पवारांना सांगितली. गावातील मुले बाहेर शिक्षणाला किती आहेत, अशी विचारणा पवारांनी शेतकर्‍यांकडे केली. दुष्काळामुळे शिक्षणात अडथळा येत असेल तर मदत करण्याबाबत प्रयत्न करु, असे पवारांनी शेतर्‍यांना आश्वासित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -