घरमहाराष्ट्रशरद पवारांनी भाजपसोबत यावं ही तर 'दादां'ची इच्छा; अपक्ष आमदाराच्या दाव्यामुळे खळबळ

शरद पवारांनी भाजपसोबत यावं ही तर ‘दादां’ची इच्छा; अपक्ष आमदाराच्या दाव्यामुळे खळबळ

Subscribe

अपक्ष आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सातत्याने अजित पवार हे शरद पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमरावती : धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर शुक्रवारी (10 नोव्हेंबर) शरद पवार आणि अजित पवार यांची पुन्हा एकदा प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट झाली. या भेटीनंतर अजित पवारांनी थेट दिल्ली गाठत अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. असे असतानाच आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. (Sharad Pawar wants to join BJP Excitement due to independent MLAs claim)

अपक्ष आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सातत्याने अजित पवार हे शरद पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत यावं, ज्यामुळे राज्याचं भलं होईल, राज्य सरकार मजबूत होईल, जनतेचे काम होतील. मला वाटतं की, शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात गोष्टी मान्य केल्या असतील. कुठंतरी शरद पवारांच्या भेटीत अनेक रहस्य दडलेली आहेत. लगेच अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली, तेथे राजकीय चर्चा सुद्धा झाली असेल अशीसुद्धा शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भाजपाचं मराठी प्रेम हे पुतना मावशीचं; दीपोत्सवाच्या कार्यक्रमावरून भाजप-मनसेत जुंपली

नरेंद्र मोदीजींचं काम बघून पवार पाठींबा देतील

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने विकास कामे करीत आहेत ती कामं बघून नक्कीच शरद पवार मोदींना पाठिंबा देतील. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचा विकास करण्यासाठी शरद पवार मोदींना पाठिंबा देतील, असं सध्या चित्र आहे अशीही शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा : “तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं तर…”, एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्री शिंदेंचे आभार

सरोज पाटील यांनी सांगितले भेटीमागील कारण

शुक्रवारी झालेल्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत बोलताना शरद पवार यांच्या भगिणी सरोज पाटील म्हणाल्या की, ही कुठलीही राजकीय भेट नव्हती, ही कौटुंबीक भेट होती. शुक्रवारी प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कुटुंबीय एकत्र आलो होतो. ही कौटुंबीक भेट होती. यावेळी सहकुटुंब जेवणही झालं. यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. याआधीच शरद पवार यांनी या भेटीबाबत एका वाक्यात उत्तर दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -