घरElection 2023Sharad Pawar : 'कोणाची किती जादू सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार'; निवडणूक निकालावर पवारांचे...

Sharad Pawar : ‘कोणाची किती जादू सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार’; निवडणूक निकालावर पवारांचे मत

Subscribe

रविवार (3 डिसेंबर) रोजी देशातील पाच राज्यांपैकी तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागत असून, आतापर्यंतच्य प्राथमिक कलातून तेलंगणा वगळता तीनही राज्यात भाजप आघाडीवर आहे.

मुंबई : देशातील पाच राज्यांपैकी चार राज्याच्या निवडणूक निकालाचे प्राथमिक कल हाती आली असून, तेलंगणा वगळता उर्वरीत तीन राज्यात भाजप आघाडीवर असून, तेव्हा भाजपलाच पुन्हा एकदा मतदारांनी पसंती दर्शविल्याचे दिसून येत आहे. या निवडणूक निकालावर बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले असून, त्यांना मोदींची जादू अद्याप कायम आहे का असे विचारले असता कोणाची किती जादू हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार असल्याची नेमकी प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar  Whose magic will be clear by evening; Pawars opinion on election results)

रविवार (3 डिसेंबर) रोजी देशातील पाच राज्यांपैकी तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागत असून, आतापर्यंतच्य प्राथमिक कलातून तेलंगणा वगळता तीनही राज्यात भाजप आघाडीवर आहे. यावर बोलतान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, आज लागलेल्या निवडणूक निकालाच्या राज्यांपैकी दोन ठिकाणी भाजपची सत्ता होती. प्रश्न होता राजस्थानचा. तेथे पाच वर्ष कॉंग्रेसची सत्ता होती. तेथील लोकांनी नवीन लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तेलंगणा राज्याच्या निवडणुकीत राहुल गांधी यांची हैदराबादमधील सभा गेमचेंजर ठरली. या निवडणूक निकालांच्या आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार का? असे विचारले असता पवार म्हणाले की, उद्या इंडिया आघाडीची सभा आहे. त्या बैठकीत त्या- त्या राज्यातील जानकारांकडून नेमकं त्या राज्यात काय झालं याची माहिती घेऊ, त्यानंतर कसा परिणाम झाला आणि कसा परिणाम होईल याबाबत बोलता येईल असे त्यांनी यावेळी म्हटले. तर अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कायम आहे का? असे विचारले असता पवारांनी नेमक्या भाषेत उत्तर देताना म्हटले की, या निकालानंतर मोदींची जादू आहे की नाही हे सायंकाळी सहा वाजेनंतर स्पष्ट होईल.

- Advertisement -

हेही वाचा : TELANGANA ELECTION : पिछाडीवर असूनही बीआरएस नेत्यांकडून विजयाचा दावा, हालचालींना वेग

जातीनिहाय जनगणना करा

सर्व देशामध्ये जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, त्यातूनच कोणत्या जातीला आरक्षण पाहिजेत हे कळेल. त्यानुसारच उपेक्षित घटकांना न्याय देता येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मी त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहीजे असं म्हटलं होतं. परंतू हे आरक्षण देताना दुसऱ्याच्या ताटातून काढून घेता कामा नये अशी आमची भूमिका आहे. परंतू जे काही सुरू आहे त्यामध्ये भाजपचा हात असल्याचा सूर आहे. मागील काही दिवसांपासून काही घटक आरक्षणाची मागणी करतायेत तर काहींना चिंता आहे की, त्यांचे आरक्षण कमी होते की, काय? तेव्हा आरक्षणाची मागणी हाताळताना काळजी घेणे गरजेचे आहे. आरक्षणाच्या मागणीबरोबरच राज्यात अनेक प्रश्न आहेत. दुष्काळ आहे, काही ठिकाणी अवकाळीने नुकसान झाले आहे. या सगळ्या प्रश्नांकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणं गरजेच आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मदत केली तर त्याला विरोध करणार नाही असेसुद्धा शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Chhattisgarh Election Results : विजयी घोडदौडीचे भाजपाने सांगितले कारण; “छत्तीसगडमध्ये विकास कामे…”

दादा गटात गेलेल्यांच्या जागावर उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार

सातारा लोकसभा मतदार संघाबाबत बोलताना कोणी कोठूनही निवडणूक लढू शकतो. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. तर सातारा लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादीच लढेल आमचा साताऱ्यातील लोकांवर विश्वास आहे. इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार याबाबत अद्याप चर्चा नाही. परंतू पुढील काळात चर्चा होईल. जे आमदार अजित पवारांच्या गटात गेले तेथे नवीन चेहरे देणार आणि त्यांना निवडूनसुद्धा आणणार पण नाव आताच कसे जाहीर करू असे शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -