घरमहाराष्ट्रकोरेगाव-भीमा प्रकरणी शरद पवारांचीही होणार चौकशी

कोरेगाव-भीमा प्रकरणी शरद पवारांचीही होणार चौकशी

Subscribe

चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्या. जे.एन. पटेल यांची माहिती

कोरेगाव-भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चौकशी होणार आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांनी ही माहिती दिली. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव-भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.

अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे केली होती. तसा अर्ज त्यांनी चौकशी आयोगाकडे केला होता. त्यानंतर आयोगाने यावर शरद पवारांना चौकशीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला. आयोगाचे अध्यक्ष न्या. जे.एन. पटेल यांनी यासंदर्भात माहिती दिली. कोरेगाव-भीमा प्रकरणात शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येईल. त्यांना साक्षीसाठी बोलवण्यात येईल, न्यायमूर्ती पटेल म्हणाले आहेत.

- Advertisement -

शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी कोरेगाव-भीमा दंगलीत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावे घेतली होती. कोरेगाव-भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. या स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिलेली आहे. त्या काळात जे युद्द झाले. त्यावेळी पेशव्यांचा पराभव झाला होता. ब्रिटिशांच्या बाजुने काही भारतीयही होते हे यावरुन स्पष्ट होते. इथे दरवर्षी लोक येतात. इथले स्थानिक ग्रामस्थ इथे येणार्‍या लोकांना पाण्याची व्यवस्था करतात. स्थानिक आणि बाहेरून येणार्‍यांमध्ये कोणतीही कटुता नव्हती. मात्र, आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी फिरुन वेगळे वातावरण निर्माण केले, असे पवार म्हणाले होते. त्यावरून पवारांना या दंगलीबद्दलची ही माहिती कोठून मिळाली. त्यांच्याकडे आणखी काय माहिती आहे? याबद्दल त्यांची तातडीने साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -