घरताज्या घडामोडीशरद पवार पुन्हा action मोडमध्ये, १ जूनला राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक

शरद पवार पुन्हा action मोडमध्ये, १ जूनला राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक

Subscribe

पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेतल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार बुधवारपासून पुन्हा दैनंदिन कामात सक्रिय झाले आहेत. येत्या १ जून रोजी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी दिली. पवारसाहेबांनी सक्रीय कामाला सुरुवात केल्यामुळे पक्षाला आणखी उभारी  आणि ताकदही मिळेल, असा विश्वासही  मलिक यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या आधी शरद पवार यांनी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट केले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने ते कामाला सुरुवात करणार आहेत, असेही मलिक म्हणाले. दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यात वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी सायंकाळी घेतली होती. शरद पवार यांच्यावर झालेल्या पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतर ही पहिलीच अशी झालेली भेट आहे. सायंकाळी जवळपास ४० मिनिटे दोघांमध्ये भेट झाली. राज्यातील कोरोनाची परिस्थिती तसेच मराठा आरक्षणाच्या विषयावर या भेटी दरम्यान चर्चा झाल्याची शक्यता आहे. गेल्या परंतु या भेटीचा तपशील मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेला नाही.

- Advertisement -

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लीलावती रूग्णालयातूनही राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांनी एक चिठ्ठी लिहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला होता. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडूनही एक धनादेश सुपूर्द केला होता. शस्त्रक्रियेनंतरही शरद पवार यांच्या पक्ष कार्यकर्त्यांसोबत तसेच राजकीय, सामाजिक वर्तुळातील विविध व्यक्तींच्या भेटी घेतल्या. शस्त्रक्रियेनंतर शरद पवार हे लेकीसोबत म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत मुंबईत ड्राईव्हलाही दिसले. पण पक्षाच्या कामासाठी सक्रीय होताना शरद पवार घराबाहेर पडण्याची आजची वर्षा बंगल्यावर जाण्याची शरद पवार यांची पहिलीच अशी वेळ होती. राज्यात आरोग्य यंत्रणेची सध्याची स्थिती, केंद्राकडून येणारी मदत या सगळ्या परिस्थितीकडे शरद पवार रूग्णालयातूनही लक्ष ठेवून होते. पण आजच्या भेटीच्या निमित्ताने राज्यातील कोरोनाची परिस्थिती यावरही चर्चा झाल्याची चर्चा आहे. राज्यातील लॉकडाऊनची सद्यस्थिती तसेच समाजातील विविध घटकांना होणारी सरकारी मदत याकडेही पवार लक्ष ठेवून आहेत. राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची यापुढचे पाऊल यानिमित्तानेही शरद पवार यांनी चर्चा केली असण्याची शक्यता आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -