Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शरद पवारांची ही खेळी कशासाठी? मुंडेंच्या बीडमध्ये घेणार जाहीर सभा

शरद पवारांची ही खेळी कशासाठी? मुंडेंच्या बीडमध्ये घेणार जाहीर सभा

Subscribe

शरद पवार हे बीडमध्ये म्हणजेच मंत्री धनंजय मुंडे (अजित पवार गट) यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याने पवारांची ही खेळी नेमकी कशासाठी आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार या राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) चाणक्य मानले जातात. पण दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पक्षाला पडलेल्या भल्यामोठ्या खिंडारामुळे शरद पवार हे स्वतः अस्वस्थ असलेले पाहायला मिळत आहे. स्वतःच्या पुतण्यानेच पक्षाला खिंडार पाडल्याने शरद पवार (Sharad Pawar) शांत झाले आहेत. पुतण्याने इतकी मोठी चूक करून देखील त्यांच्या भेटीगाठी होत असल्याने आता मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये भेटी होत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस राष्ट्रवादीला (शरद पवार गट) डावलून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. परंतु आता शरद पवार हे बीडमध्ये म्हणजेच मंत्री धनंजय मुंडे (अजित पवार गट) यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याने पवारांची ही खेळी नेमकी कशासाठी आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Sharad Pawar will hold a meeting in Dhananjay Munde’s Beed)

हेही वाचा – मी पुन्हा येईन! 2024 मध्ये पंतप्रधान होणार असल्याचा मोदींना विश्वास

- Advertisement -

शरद पवार हे बीडमधील सभेमधून आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर काल (ता. 15 ऑगस्ट) ध्वजारोहणानंतर बीडमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडून या सभेबाबत सूचक वक्तव्य करण्यात आले आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कोण कोणाला कोंडीत पकडत आहे, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा, असे म्हणत मुंडेंनी आपले मत व्यक्त केले. त्यामुळे मुंडेंना नेमके काय बोलायचे होते, याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

शरद पवार यांची उद्या 17 ऑगस्टला बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये शरद पवार नेमकं काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. परंतु ते नेमकी कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण शनिवारी (ता. 12 ऑगस्ट) उद्योजक चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवार आणि अजित पवार यांची झालेली भेट ही राजकीय भूकंप घडवून आणणारी ठरू शकते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार यांनी सांगितले होते का असा प्रश्न देखील आता निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यानंतर स्वतः शरद पवार देखील भाजपला पाठिंबा देतात का? अशी संभ्रमावस्था सध्या ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षामध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माहिती देत सांगितले की, येत्या 17 तारखेला शरद पवार बीडला जाणार आहेत. त्याठिकाणी एक जाहीरसभा होणार आहे. ही सभा खूप मोठी असेल. बीडनंतर पुण्यातही सभा होईल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगला संवाद आहे. पण काँग्रेसच्या मनात काही शंका असू शकते. बीड येथील सभेतून शरद पवार अधिक स्पष्टपणे आपली भूमिका मांडतील.

- Advertisment -