घरमहाराष्ट्रशरद पवारांचा वाढदिवस 'बळीराजा कृतज्ञता दिन' म्हणून साजरा करणार

शरद पवारांचा वाढदिवस ‘बळीराजा कृतज्ञता दिन’ म्हणून साजरा करणार

Subscribe

शरद पवारांचा वाढदिवस 'बळीराजा कृतज्ञता दिन' म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबरला वाढदिवस आहे. मात्र, यंदा राष्ट्रवादी काँग्रेस हा दिवस ‘बळीराजा कृतज्ञता दिन’ म्हणून साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवार हे ८० व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. त्यामुळे ८० लाख रुपयांचा निधी शरद पवार यांच्याकडे सुपुर्द करणार असल्याचे सांगत हा निधी राष्ट्रवादी वेलफेअर फंडात जाणार असल्याचे त्यानी सांगितले आहे. तसेच याद्वारे कोष वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगत जो शेतकरी अडचणीत आहे त्याला यामाध्यमातून दिलासा देण्याचे काम केले जाईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, १२ तारखेला सकाळी शरद पवार १०.३० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे उपस्थित राहणार असून, १२ वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यात येतील. मात्र, यावेळी हारतुरे स्विकारले जाणार नसल्याचे मलिक यांनी सांगितले. तसेच शुभेच्छा म्हणून कार्यकर्ते निधी देऊ शकतात. जो शेतकऱ्यांसाठी वापरला जाईल, असे देखील नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

असा होणार राज्यभर वाढदिवस साजरा

शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी क्रीडा स्पर्धा, पर्यावरण रक्षणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच महानेता विकास आणि पर्यावरणाचा, असे देखील स्लोगन देण्यात आले आहे. या दिवशी सरकारी आणि महानगर पालिकेच्या रुग्णालायत फळवाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. एवढे नाही तर ११ डिसेंबर ते २० डिसेंबर सरकारी, पालिकेच्या रुग्णालायत स्वछता अभियान हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अखेर एकनाथ खडसे म्हणाले, ‘…तर वेगळा विचार करावा लागेल’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -