घरताज्या घडामोडीशरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी

शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.  शरद पवारांच्या या घोषणेनंतर त्यांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी यासाठी कार्यकर्त्यांकडून पवारांना विनंती केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.  शरद पवारांच्या या घोषणेनंतर त्यांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी यासाठी कार्यकर्त्यांकडून पवारांना विनंती केली जात आहे. सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी केली आहे. तसेच, शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी विनंती करत आहेत. (Sharad Pawar will retire from the post of President of NCP)

‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमात संबोधित करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतो अशी घोषणा केली. तसेच, पुढील अध्यक्षाचा निर्णय निवड समिती मार्फत करावी असेही शरद पवार यांनी सांगितले. मात्र शरद पवारांच्या या निवृत्तीच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला.

- Advertisement -

शरद पवार यांच्या या निर्णयानंतर नवा अध्यक्ष कोण होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणाही यावेळी शरद पवार यांनी केली. तसेच, अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असलो तरी, माझी निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रातील नाही. शिवाय, राज्यसभा सदस्यत्वाची तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचेही शरद पवारांनी यावेळी सांगितले.

शरद पवारांच्या अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर होत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार निवृत्तीची घोषणा मागे घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सकाळच्या शपथविधीनंतर पवारांनी अजित पवारांना ‘असं’ केलं माफ; ‘लोक माझे सांगाती’मध्ये खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -