घरताज्या घडामोडीमविआ सरकार नुसतं ५ वर्ष टिकणार नाही तर लोकांसाठी काम करणार, शरद...

मविआ सरकार नुसतं ५ वर्ष टिकणार नाही तर लोकांसाठी काम करणार, शरद पवार यांचे आश्वासन

Subscribe

शिवसेना विश्वास असणारा पक्ष

महाविकास आघाडी सरकार हे ५ वर्ष टिकणार आणि नुसतं टिकणार नाही तर लोकांसाठी काम करणार असे आश्वासन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेला दिलं आहे. शिवसेना उत्तम आणि विश्वास असणारा पक्ष आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सरकार टिकण्यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत यावरही शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेत २२ वर्षांचा टप्पा पुर्ण केला असून वर्धापनदिनाच्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राज्य सरकारमधील नेत्यांच्या कामांची स्तुती केली आहेत तर हे सरकार ५ वर्ष टिकेल असा विश्वासही व्यक्त केला आहे. तर शरद पवार यांनी मोदी-ठाकरे यांच्या वैयक्तिक भेटीवरही वक्तव्य केलं आहे.

समाधानाची गोष्ट आहे की, राष्ट्रवादीची निर्मिती केल्यानंतर तो पक्ष थोडेफार धक्के सहन करण्याची स्थिती आली असेल पण सतत हा पक्ष योग्य रस्त्याने जात होता यामुळे लोकांचे समर्थन मिळत होते. अनेकांनी अनेक पक्ष काढले काही टिकले, काही कधी गेले हे कळाले सुद्धा नाही. असे अनेक उदाहरणं पाहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैशिष्ट्ये आहे की, सहकाऱ्यांच्या कष्टाने तुमच्या जनतेच्या बांधिलकीने आज २२ वर्ष दिवसेंदिवस जनमाणसांमध्ये शक्ती वाढवण्यासाठी आणि विश्वास संपादन करण्यासाठी यशस्वी झालो आहेत.

- Advertisement -

कधी सत्तेत होतो. १५ वर्ष सत्तेत होतो तर कधी नव्हतो याचा काही फारसा परिणाम होत नाही. काही लोक सोडून गेलं तर नवीन लोकं तयार झाले. नवीन नेतृत्व तयार झाले आहेत. मंत्रिमंडळात अनेक नेते असे आहेत की, अत्यंत महत्त्वाची जबाबदारी संभाळत असून यशस्वी झाले आहेत. यापुर्वी त्यांच्यामध्ये हे कर्तृत्व लोकांच्या समोर आले नव्हते. याचा उदाहरण म्हणजे राजेश टोपे संपुर्ण देशात नव्हे तर संपुर्ण विश्वास समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीमध्ये या देशात एकंदरती गंभीर स्थिती महाराष्ट्राची होती या स्थितीशी सामना आणि जनतेला विश्वास देण्यासाठी दिलासा देण्यासाठी ज्या प्रकारे राजेश टोपे यांच्या नेतृत्वात आरोग्यविभागाने काम केलं त्याचा परिणाम या सगळ्या संकटातून बाहेर पडू शकतो हा विश्वास सर्वसामान्यांमध्ये आला. राजेंद्र शिंगणे, टोपे आणि अनेक नेत्यांनी आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पडली आहे. संकटकाळात विश्वास देण्याचे काम राष्ट्रवादीनं केलं आहे.

शिवसेना विश्वास असणारा पक्ष

महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे. वेगवेगळ्या विचारांच सरकार स्थापन केलं आहे. कधी वाटले नव्हते की शिवसेनेसोबत काम करु सरकार बनवू परंतु हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत बऱ्याच चर्चा करण्यात आल्या आहेत. हे सरकार ५ वर्ष टिकेलही आणि विधानसभा, लोकसभेला चांगली कामगिरीही करेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

राज्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे. परंतु त्यामुळे नेतृत्वाची फळी निर्माण होते हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. याचे १०० टक्के श्रेय हे पाठीशी उभ्या राहणाऱ्या सामान्यांचं असून त्यांची बांधीलकी ठेवली पाहिजे असे शरद पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवक महिला, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना पाठिंबा दिला की एक विश्वास येतो की उद्या महाराष्ट्राची जबाबदारी संभाळण्याची कुवत असलेली पिढी राष्ट्रवादी काँग्रेसमधून तयार होत आहे. त्यांना प्रोत्साहित करण्यासंबंधित काम केलं पाहिजे.

मोदी- ठाकरेंच्या भेटीवर वावड्या

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर असे कळाले की पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठकीला बसले होते. अनेकांनी त्यावर चर्चा विनिमय केला आहे. कोणी काहीही करो पण लगेच वेगवेगळ्या शंका आणि वावड्या महाराष्ट्रात अनेक लोकांनी उठवल्या आहेत. हा पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आहे आणि आता शिवसेना आहे. शिवसेनेसोबत कधी काम केले नव्हते परंतु महाराष्ट्र अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे पाहत आहे. या सगळ्या गोष्टी फास आहेत. ज्यावेळी काँग्रेसचा देशात परभव झाला अशा वेळी काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक पक्ष पुढे आला तो म्हणजे शिवसेना असे उदाहरणही शरद पवार यांनी सांगितले आहे.

शिवभोजन थाळी उपक्रमावर शंका होती

कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये एक उपक्रम शिवभोजन थाळीसारखा हाती घेतला. तो उपक्रम राबवण्यासंबंधात चर्चा झाली. तेव्हा माझ्या मनात शंका होती. की कसं होईल अशी शंका होती परंतु हे काम उत्तम प्रकारे सुरु आहे. असे अनेक उपक्रम आहेत सगळ्या संकटाच्या काळात आपण थांबलो नाही डगमगलो नाही. कोरोनाला सामोरे गेलो. शिवभोजन सारखे कार्यक्रम राबविले गोरगरीबांना शेवटच्या माणसांपर्यंत अन्नधान्य पुरवण्यात यशस्वी झालो आहोत. यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्याच्या संबंधी आणि भवितव्यासंबंधी चिंता वाटत नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणासारखे प्रश्न सोडवावे लागणार

मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था असे अनेक प्रश्न सोडवावे लागणार आहेत. सत्ता अधिक हातात गेला पाहिजे. सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर ती भ्रष्ट होते त्यामुळे सत्ता अधिक लोकांच्या हाती गेली पाहिजे हे मान्य असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला सत्तेचा वाटेकरी आहे असे वाटलं पाहिजे. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

मी स्वतः मुख्यमंत्री असताना ग्रामपंचायत, गावचे पोलीस पाटील यामधअयेही ओबीसी आणि इतरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील एखा गावात गेलो असता चहा घेण्यासाठी एका घरात गेलो तिथे जुने कार्यकर्ते होते. त्यांनी मला म्हटले साहेब हे काम चांगलम नाही केलं आमच्या गावची पाटीलकी गेल्यावर कसं व्हायचं असे म्हटले. यावर नुकसान काय असं विचारलं असता त्यांना उत्तर देता आले नाही. यानंतर पाच ते सात वर्षांनी भेट झाली तेव्हा गाव आता पुर्वीपेक्षा एकत्रित असल्याचे सांगितले याचे कारण सत्ता पिढ्यानंपिढ्या आमच्या घरात ठेवली होती सत्ता अधिक घरी गेली हे लोकांना आवडलं असल्याचे त्यांनी सांगितले असल्याची आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -