घरताज्या घडामोडीबंडखोर आमदारांविरोधात शरद पवार रणांगणात; उद्धव ठाकरेंना करणार मदत

बंडखोर आमदारांविरोधात शरद पवार रणांगणात; उद्धव ठाकरेंना करणार मदत

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) संपुष्टात येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी याप्रकरणात एन्ट्री घेतली आहे. कालच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोर आमदारांना कायदेशीर इशारा दिला होता. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार आता आणखी सक्रीय झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या तासाभरापासून शिवसेना नेते (Shivsena Leaders) आणि  शरद पवारांची बैठक सुरू होती. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना नेते अनिल देसाईं (Anil Desai) उपस्थित होते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीवर शरद पवार काय रणनिती आखतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.  (Sharad pawar’s entry in Sena rebel mla controversy)

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या समर्थनासाठी शिवसैनिकांचे गाठले गुवाहाटी; पोलिसांनी घेतले ताब्यात

- Advertisement -

२०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधीही शरद पवारांनीच मोडून काढला होता. शरद पवारांनी केलेली राजकीय खेळी आतापर्यंत कधीच वाया गेली नाही, असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – अजय चौधरी, सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता, शिंदे गट कोर्टात धाव घेण्याची शक्यता?

- Advertisement -

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची काल बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. संवादादरम्यान, त्यांनी या बंडखोरीविरोधात कायदेशीर इशारा दिला. तसेच, महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष उत्तम काम केले. कोरोना काळात सरकारने चांगेल काम केले. यामुळे हे सरकार विधान भवनात बहुमतात असेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला होता.

हेही वाचा – तुम्ही आता मुंबईत याच हे आमचं आव्हान, संजय राऊतांची शिंदे समर्थक आमदारांना धमकी

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील. आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहोत, असंव शरद पवार म्हणाले होते. विधानसभेत फ्लोअर टेस्ट केल्यावर कळेल की हे सरकार बहुमतात आहे, असे पवारांनी स्पष्ट केले. काही गोष्टी झाल्या त्या नाकारता येणार नाहीत. जे आमदार बाहेर नेण्यात आले ते मुंबईत आल्यावर आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही पवार म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -