घरताज्या घडामोडीहॉटेल उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा द्यावा, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॉटेल उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा द्यावा, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धरतीवर राज्यात देखील उद्योग व्यवसायाला संजिवनी देजारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबवावी

आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्यादृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. कोविड-१९ ह्या जागतिक महामारीच्या दुसर्‍या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे असेही शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत शरद पवार यांची भेट घेत त्यांना अवगत केले. शरद पवार यांनी व्यावसायिकांना प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे की, ‘कोव्हिड-१९ हा जागतिक महामारीच्या दूसऱ्या लाटेने महाराषट्रात अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, कोरोना विषाणूची संक्रमण-साखळी तोडावयाची असल्याने पुन्हा एकदा संचारबंदीचा निर्णय शासनाला घ्यावा लागला. परिणामी व्यवसाय-धंदे बंद करण्यात आले आणि पुन्हा एकदा हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. ह्या पार्श्वभूमीवर हॉटल-रेसटॉरंट,आदरातिथ्य उद्योगातील काही प्रतिनिधीनी त्यांना भेडसवणाऱ्या समस्या मला अवगत केल्या, सर्वच समस्यांचे निराकरण ह्या अभुतपूर्व परिस्थितीत जिकिरीचे असले तरी काही मागण्यांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो.

१. एफल-३ परवानाधारक हॉटेल-परमीटबार मालकाना अबकारी कराचा भरणा किसान ४ हफ्त्यांमध्ये करण्याची सवलत यावी.

- Advertisement -

२. वीज बिलात सवलत मिळावी तरोच मालत्ता करात सूट मिळावी.

३. केद्रीय अर्थ मंत्रलयाने आपतकालीन पतरेखा हमी योजना क्र.१.० व २.० अंमलात आणून सदर योजनेला दिनांक ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तीच पर्यटन-आदरातिध्य व्यवसायांकरिता क्र.३.० योजना जाहिर केली आहे. दिनांक ३१ मार्च.२०२१ रोजी प्रसारीत केलेली प्रेसनोट माहितीस्तव जोडली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धरतीवर राज्यात देखील उद्योग व्यवसायाला संजिवनी देजारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबवावी, हॉटेल-उपहारग्रहे -परमीटरुम व आदरातिथ्य उद्योग क्षेत्रातील व्यवसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने उपरोक्त मागण्यांचा आपणाकड़ून सहानुभूतीपुर्वक विचार होईल अशी मी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या मार्गदर्शनाखाली कोव्हिड-१९ च्या संकटातून जनतेला दिलासा मिळेल याचा मला विश्वास आहे अशा आशयाचे पत्र शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -