घरताज्या घडामोडीशरद पवारांना विधानसभेला पहिली उमेदवारी मिळताच, तालुका कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले होते...

शरद पवारांना विधानसभेला पहिली उमेदवारी मिळताच, तालुका कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले होते राजीनामे

Subscribe

शरद पवारांच्या संसदीय कारकीर्दीला ५४ वर्षे पूर्ण, घेतला हा मोठा निर्णय़

महाराष्ट्राच राजकारण असो केंद्रातल, राजकारणात ज्यांच्या शब्दाने संपुर्ण राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळते, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस म्हणजे २२ फेब्रुवारी १९६७ हा होय. महाराष्ट्राच्या विधीमंडळात शरद पवार निवडून गेले तो हाच दिवस. शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला आज सोमवार २२ फेब्रुवारी २०२१ रोजी ५४ वर्षे पुर्ण झाली आहेत. आपल्या राजकीय कारकीर्दीत नेहमीच मोठा विचार करणाऱ्या शरद पवार यांनी राज्यातील कोरोनाचे संकट पाहतानाच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयसाठी खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना आवाहन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हा निर्णय देखील राज्याच्या हिताच्या निमित्तानेच त्यांनी घेतलेला आहे. शरद पवार यांनी त्यांच्या संसदीय कारकीर्दीच्या ५४ वर्षांच्या निमित्ताने घेतलेला निर्णयही तितकाच महत्वाचा असा मानला जात आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच सर्वाधिक कोरोनाचे प्रमाण आढळल्यानेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने याआधीच जनता दरबार दोन आठवणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे शरद पवार यांचा निर्णय ?

गेल्या आठवड्याभरातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी वाढली आहे. गेल्याच आठवड्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, एकनाथ खडसे, छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती. राज्यात वाढता कोरोनाचा आकडा पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही जनता दरबार दोन आठवड्यांसाठी बंद करत असल्याचे जाहीर केले. आता खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेसाठी शरद पवार यांनी आपल्या संसदीय कामकाजात घेतलेला हा एक आणखी एक मोठा निर्णय आहे.

- Advertisement -

पहिल्याच विधानसभा उमेदवारीसाठी शरद पवारांना विरोध 

विधानसभेची निवडणूक ही १९६७ नियोजित करण्यात आली होती. वयाची अवघी २६ वर्षे पुर्ण झालेल्या शरद पवार यांच्याकडे युवक कॉंग्रेसची जबाबदारी होती. तत्कालीन कॉंग्रेस प्रदेशाध्य़क्ष विनायकराव पाटील यांनी बारामतीत संधी दिल्यास लढणार का ? असा प्रश्न शरद पवारांना केला. पण बारामतीमधील सर्व नेत्यांनी एकत्र येत शरद पवार यांच्या नावाला विरोधही केला. बारामतीत शरद पवार यांच्या नावाला १ विरूद्ध ११ असा निकाल बारामती तालुका कॉंग्रेसने कळवला. जिल्हा कॉंग्रेसनेही हाच निकाल प्रदेश कॉंग्रेसकडे पाठवला.

- Advertisement -

तत्कालीन मुख्यंत्र्यांसमोर हा स्थानिक संघटनेचा ठराव आला. त्यामध्ये शरद पवार नवखे आहेत, त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे असे मत सांगण्यात आले. पण प्रदेशाध्यक्ष पाटील आणि यशवंतराव चव्हाण आपल्या निकालावर ठाम होते. शरद पवारांच्या नावाला विरोध करणाऱ्यांपैकी एकाला यशवंतराव चव्हाण म्हणाले, २७० पैकी किती जागांवर कॉंग्रेस विजय होईल असे त्यांनी विचारले. त्यावर १९० ते २०० असे उत्तर आले. पण ८० पराभूत उमेदवारात आता बारामतीची आणखी एक जागा असे उत्तर यशवंतराव चव्हाण यांनी दिले. पण शरदलाच उमेदवारी द्या असे यशवंतराव म्हणाले.

yuvak congress

यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शरद पवारांना उमेदवारी मिळाली खरी, पण त्यांना स्थानिक पातळीवर विरोध कायमच राहिला. शरद पवारांना उमेदवारी मिळाली कळताच तालुका कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत एकजुट दाखवली. तर दुसरीकडे युवक कॉंग्रेसचा सर्व युवा वर्ग शरद पवारांच्या बाजूने उभा राहिला. एका बाजूला तालुका कॉंग्रेसमधील जेष्ठ नेत्यांची एकी तर दुसरीकडे युवक कॉंग्रेसची तरूण पिढी. या निवडणुकीत बारामतीमध्ये शरद पवारांना नवखी अशी उमेदवारी मिळूनही प्रतिस्पर्ध्याच्या दुप्पट असे मताधिक्य मिळाले हे विशेष. त्यामुळे राज्याला बारामतीतून युवा मुख्यमंत्री मिळवून देण्याची बिजे याच निवडणूकीने रोवली होती हे कालांतराने स्पष्ट झाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -