Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शरद पवारांचे पीए ते राज्याचे गृहमंत्री, दिलीप वळसे पाटलांचा राजकीय प्रवास

शरद पवारांचे पीए ते राज्याचे गृहमंत्री, दिलीप वळसे पाटलांचा राजकीय प्रवास

Related Story

- Advertisement -

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्री पदासाठी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना विनंती पत्र लिहून गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा अशी विनंती केली आहे. तर वळसे-पाटील यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार आहे.

शरद पवारांचे स्वीय सहाय्यक

राज्याचे नवे गृहमंत्र बनलेल्या दिलीप वळसे पाटील हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक होते. त्यानंतर त्यांनी राजकाणात प्रवेश केला. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. राज्यभर फिरून त्यांनी महाराष्ट्र जाणून घेतला. १९९० साली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली.

१९९० ला पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले

- Advertisement -

त्यावेळी जनता दलाचे खासदार असलेले किसनराव बाणखेले यांचा तालुक्‍यावर प्रभाव होता. मात्र, १९९० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून वळसे-पाटील पहिल्यांदा विधानसभेत गेले. त्यानंतर १९९० पासून सलग ७ वेळा आंबेगाव मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला.

मंत्री पदाचा दांडगा अनुभव

वैद्यकीय शिक्षण मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, ऊर्जा मंत्री, अर्थमंत्री, उत्पादन शुल्क मंत्री अशा खात्यांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. २००९ ते २०१४ या कालखंडात विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. मतदारसंघातील माळीण गावात दुर्दैवी झालेल्या घटनेत जातीने लक्ष घालून आपत्तीच्या दिवसापासून ते पुनर्वसनामध्ये जातीने लक्ष घालून वेगळेपण दाखवून दिले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी काम करत असताना साखर उद्योग व शेतकऱ्यांसाठी देशपातळीवर काम केले. १४ ऑगस्ट २०१७ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदावर निवड झाली.


- Advertisement -

हेही वाचा – दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री


 

- Advertisement -