Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "हा ट्रेंड कायम राहिला तर...", 2024 बद्दल शरद पवारांचे भाकित

“हा ट्रेंड कायम राहिला तर…”, 2024 बद्दल शरद पवारांचे भाकित

Subscribe

हा ट्रेंड कायम राहिला तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल. हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही, असे म्हणत त्यांनी भाजप विरोधातील देशातील राजकारणाबाबच शक्यता व्यक्त केली आहे.

कर्नाटकात भाजपला पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर देशातील विरोधी पक्षांमधील आत्मविश्वास बळावला असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक विरोधी पक्षांनी देशात भाजपविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील भाजपची परिस्थिती पाहता हळूहळू सर्वच राज्यातून भाजप पराभूत होणार असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. अशातच आता 2024 च्या लोकसभा निवडणुकांवरून शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राज्याच्या निवडणुकीत लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. त्यामुळे हा ट्रेंड कायम राहिला तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल, अशी शक्यता शरद पवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा –  कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, आक्षेपार्ह स्टेट्सवर कारवाईची मागणी

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. तर निवडणुकांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यांमधील निवडणुकीचा देशातील ट्रेंड हा भाजपविरोधी आहे. देशाचा नकाशा समोर ठेवला तर केरळमध्ये भाजप नाही. तामिळनाडूत नाही. कर्नाटकात नाही. तेलंगणात नाही. आंध्रात नाही. गोव्यात नव्हती, आमदार फोडून राज्य आणले. महाराष्ट्र बाजूला ठेवा. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. हे मान्य करू. मध्यप्रदेशात आमदार फोडले राज्य आणले. यूपीत भाजपची सत्ता आहे. झारखंड, छत्तीसगड, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल या सर्व ठिकाणी भाजप नाही. भाजप फक्त गुजरात, यूपी आणि आसाममध्ये आहे. म्हणजे राज्याच्या निवडणुकीत लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. हा ट्रेंड कायम राहिला तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल. हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही, असे म्हणत त्यांनी भाजप विरोधातील देशातील राजकारणाबाबच शक्यता व्यक्त केली आहे.

यावेळी शरद पवार यांच्याकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करण्यात आले. केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली आहे. या सरकारमधील कोणता मंत्री तुमचा आवडता आहे, असा प्रश्न यावेळी पत्रकाराकडून विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत शरद पवार म्हणाले की, काही लोकांचं काम वादातीत नाही. उदा. नितीन गडकरी. विकासाच्या कामात नितीन गडकरी यांचा रस असतो. शासन तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही काही तरी रिझल्ट दिला पाहिजे. त्यात गडकरी आहे. गडकरींचं वैशिष्ट्ये म्हणजे ते पक्षीय दृष्टिकोण ठेवत नाही. त्यांच्यासमोर एखादा प्रश्न मांडला तर कोण सांगतो या पेक्षा प्रश्न किती महत्त्वाचा आहे हे ते पाहतात. ही समंजसपणाची गोष्ट आहे. अशा प्रकारचा अनुभव त्यांच्याबद्दलचाच आहे, असे म्हणत पवारांनी गडकरींच्या कामाचे कौतुक केले.

- Advertisement -

आज शेतकऱ्यांच्या घरात 50 टक्क्यापेक्षा जास्त कापूस आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती भयंकर आहे. केंद्र आणि राज्य सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल. नाही दखल घेतली तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल. राष्ट्रवादी त्यांच्या पाठी उभी राहील, असा इशारा त्यांनी दिला. सध्याच्या सरकारचा दृष्टीकोण शेती आणि शेतकऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह नाही. कांदाची निर्यात बंदी का करावी. साखरच्या निर्यातीला मर्यादि दिल्या आहेत. कोटा दिला आहे. दुसरीकडे साखरेच्या किंमती पडत आहेत. हे सर्व शेतकऱ्यांच्या हिताचं नाही, असे म्हणत शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल चिंता व्यक्त केली आहे.

- Advertisment -