राज्यसभेसाठी शरद पवारांचा संभाजी राजेंना पाठिंबा

Sharad Pawar's support to Sambhaji Raje for Rajya Sabha
Sharad Pawar's support to Sambhaji Raje for Rajya Sabha

राज्यसभेच्या 6 जागांसाठी जुलैमध्य निवडणूक होणार आहे. या निवडूकीत भाजप दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेचा एक उमेदवार निवडऊन येईल येवढे त्यांच्याकडे संख्याबळ आहे. यामुळे सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्यावर खासदार शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल असे शरद पवार यांनी जाहीर केले आहे.

छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना निवडून येण्यासाठी 42 आमदारांच्या मताची आवश्यकता आहे. तर अर्ज दाखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची आवश्यकता आहे. संभाजीराजेंनी यासाठी आपक्ष आमदारांना साद घातली आहे. त्यांनी राज्यातील पक्षांना त्यांच्याकडे संख्याबळ नसल्याने ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावर छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा जाहीर केला आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ, असे शरद पवारांनी जाहीर केले आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे 27 मते शिल्लक राहतात. पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरून महाविकास आघाडीकडे एकूण 46 मते शिल्लक राहतात. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांच्या आधारे संभाजीराजे राज्यसभेवर निवडून येऊ शकतात.