घरमहाराष्ट्र'शिवसेना-भाजपमध्ये वाढलेलं अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होता', पवार उलगडणार वादळी राजकीय कालखंड

‘शिवसेना-भाजपमध्ये वाढलेलं अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होता’, पवार उलगडणार वादळी राजकीय कालखंड

Subscribe

शरद पवार यांचे 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मकथेची सुधारीत आवृत्ती २ मेला प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात त्यांनी २०१५ नंतरच्या राजकीय घडामोडींचा उल्लेख केला आहे.

Lok Maje Sangati a revised version मुंबई – भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व अर्थात नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून आणि विधानांतून शिवसेनेविषयी फारशी सहानुभूती नसल्याचंच प्रतीत होत होतं. शिवसेनेच्या मात्र भाजपकडून अपेक्षा पूर्वीप्रमाणेच कायम होत्या. हे निरीक्षण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे.

शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेची सुधारीत आवृत्ती २ मे रोजी प्रकाशित होत आहे. २०१५ ते आतापर्यंतचा वादळी कालखंड चितारणारी ही सुधारीत आवृत्ती असल्याचे या पुस्तकाच्या मुखपृष्टावरच लिहिण्यात आले आहे. त्यावरुनच हे पुस्तक २०१९ च्या निवडणूक निकालाआधी आणि नंतरचे अनेक खुलासे करणारे ठरणार असल्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

शिवसेनेत आग धुमसत होती
२०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजप युतीमध्ये सुरु झालेला कलगीतुरा हा युती संपुष्टात येण्याची चिन्ह होती, याबद्दल पवारांनी या पुस्तकात खुलासा केला आहे. ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारीत आवृत्तीतील अंश समोर आले आहेत. त्यात पवारांनी म्हटले आहे, की ‘ शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागांतून तिचं उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला राज्यात निर्विवाद वर्चस्व स्थापन करता येणार नाही, असा सरळ राजकीय हिशेब भाजपचा होता. याच्यामुळे आपल्या अस्तित्वावर भाजप उठला आहे, याविषयी शिवसेनेच्या नेतृत्वात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्यातही तीव्र संताप होता. सत्तेत एकत्र असल्यामुळे त्याचा उद्रेक झाला नाही; परंतू आग धुमसत होती.’

‘लोकसभा निवडणुकीपूर्वी युती आवश्यक आहे, हे भाजपच्या लक्षात आल्यानंतर अमित शहा ‘मातोश्री’वर गेले, आणि मनानं दुभंगलेली युती पुन्हा एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरली. युतीनं लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या आमि विधानसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा कलगी-तुरा रंगायला लागला. ‘तुमची ताकद कमी झाली आहे,’ हे शिवसेनेला सांगायची एकही संधी सोडायची नाही, असं भाजपचं बहुधा ठरलं होतं.’ असं सांगत पवारांनी भाजप शिवसेनेला कसं डावलत होती, कमी लेखत होती हेच सांगितलं आहे.

- Advertisement -

शिवसेनेचं ओझं उतरवण्याची भाजपची तयारी
विधानसभा निवडणुकीत १७१ जागा लढवणाऱ्या शिवसेनेला फक्त १२४ जागा सोडूत भाजपनं तब्बल १६४ जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. स्वतःच्या बळावर पूर्ण बहुमत मिळवत शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचाच चंग अती-आत्मविश्वासत दंग भाजपने बांधला होता, असंही या पुस्तकात म्हटलं आहे. त्यासोबतच ‘५० विधानसभा मतदारसंघात युतीसमोर बंडखोरांचं आव्हान होतं. त्यातल्या बहुतांश जणांचे ठोकलेल दंड हे नेत्यांच्या आशीर्वादानं, पक्षाच्या पाठबळावरच होते, हे आमच्या लक्षात आलं होतं. युतीतील वाढलेलं अंतर हा आमच्यासाठी शुभसंकेत होता.’ अशा पद्धतीने महाविकास आघाडीची जुळणी झाल्याचं पवारांनी पुस्तकातून उलगडलं आहे.

मात्र महाविकास आघाडी झाल्यानंतरही अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी का केला. कोणाच्या सांगण्यावरुन केला. याचाही उलगडा पवारांनी या पुस्तकात केला आहे, का याची महाराष्ट्राला आणि देशालाही उत्सूकता लागून राहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -