Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शरद पोंक्षेंनी घेतली शरद पवारांची भेट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

शरद पोंक्षेंनी घेतली शरद पवारांची भेट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Subscribe

मुंबई – मराठीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परस्परविरोधी मतं असलेली ही दोन माणसं का भेटली असतील असा प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचा – ‘ठाकरे’ गटाचे उपनेते बागुल आणि ‘शिंदे’ गटाचे खासदार गोडसे यांचा एकत्र प्रवास

- Advertisement -

शरद पोंक्षे यांनी मी नथूराम गोडसे बोलतेय या नाटकात भूमिका साकारली आहे. त्यामुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. तसंच, ते कट्टर हिंदुत्त्ववादीही आहेत. तर, दुसरीकडे शरद पवारांनी नेहमीच पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेला आहे. त्यामुळे या दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा – दिलासा! १५ दिवसांत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई; कृषीमंत्री सत्तारांची घोषणा

- Advertisement -

दरम्यान, नाट्य परिषदेसंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्याकरता शरद पोंक्षे शरद पवारांच्या भेटीला गेले होते अशी चर्चा आहे. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

- Advertisment -