Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रMaha Politics : जुन्नरची उमेदवारी कोणाला? शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची जयंत पाटलांसोबत...

Maha Politics : जुन्नरची उमेदवारी कोणाला? शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची जयंत पाटलांसोबत भोजन पे चर्चा

Subscribe

पुणे – विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आली आहे. राज्यात राजकीय पक्षांच्या यात्रा आणि नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. तर विधानसभेसाठी इच्छूकांच्या नेत्यांसोबत गाठीभेटी वाढल्या आहेत. आहे त्या पक्षात विधानसभेचे तिकीट मिळेल की नाही, याची खात्री मिळत नसल्यामुळे या पक्षातून त्या पक्षात जाण्याचीही अनेकांची तयारी आहे. अशा आयाराम-गयारामांकडून ऐन निवडणुकीत पक्षांतर टळावे यासाठी आतापासून फिल्डिंग लावली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज शिवनेरी किल्ल्यापासून निघाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली आहे. जुन्नर येथील सभेनंतर जयंत पाटील हे दुपारच्या भोजनासाठी जय हिंद महाविद्यालयात थांबले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा तिथे जयंत पाटील यांच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. माजी आमदार सोनवणे यांनी फक्त भेटच घेतली नाही तर, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भोजनाचाही आस्वाद घेतला. भोजनादरम्यान या नेत्यांच्या चर्चेमध्ये काय शिजले याची आता जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे.

- Advertisement -

कोण आहेत शरद सोनवणे

शरद सोनवणे हे जुन्नरमधून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. ते सध्या शिवसेना शिंदे गटासोबत आहेत. 2014 मध्ये ते मनसेमध्ये होते. तेव्हा ते मनसेचे राज्यातील एकमेव आमदार होते. ‘जन्नर वगळता मनसेचं इंजिन यार्डात’ अशा आशयाच्या हेडलाईन तेव्हा छापून आल्या होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2019 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनकेंच्याविरोधात त्यांचा पराभव झाला. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ते शिंदे गटासोबत आहेत.

महाविकास आघाडीचा जुन्नरचा उमेदवार कोण? 

जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे सध्या अजित दादा गटात आहेत. त्यांनीही लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र आज युवक अध्यक्ष महेबूब शेख यांनी आमदार बेनकेंचा उल्लेख करुन महत्त्वाचे वक्तव्य केले. लोकसभेआधी जे आपल्याकडे आले, संकटात जे सोबत राहिले तेच खरे आपले. एकदा विश्वास नावाचा पक्षी उडाला की परत येत नाही. अजित पवार गटाला त्यांनी आलीबाबा चाळीस चोरांची टोळी म्हणत त्यांना परत घेऊ नका म्हटले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे सत्यशील शेरकर देखील शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होते. त्यांचेही भाषण राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत झाले. तेव्हा जुन्नरची उमेदवारी काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांना मिळणार की शिंदे गटातील शरद सोनवणे यांचे पारडे जड ठरणार हे पाहाणे महत्त्वाचे राहणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : NCP Vs NCP : लाडकी बहीणवरुन दोन्ही राष्ट्रवादीमध्ये रंगला कलगीतुरा; बारामतीच्या जनतेने दाखवलं लाडकी कोण?

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -