घरमहाराष्ट्रपुणेSharad vs Patel : प्रफुल्ल पटेल यांनी ईडीवर पुस्तक लिहावं; शरद पवारांचा...

Sharad vs Patel : प्रफुल्ल पटेल यांनी ईडीवर पुस्तक लिहावं; शरद पवारांचा पटेलांना टोला

Subscribe

पुणे : कर्जत येथील अजित पवार गटाच्या मंथन शिबिरात बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते की, माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यात मी पुस्तक लिहिणार असून त्यात माझी बाजू मांडेन, असे सुतोवाच केले होते. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता. (Sharad vs Patel They should write a book on how people leave the party Sharad Pawar taunt to Praful Patel)

हेही वाचा – Baramati Lok Sabha Elections : अजित पवारांच्या घोषणेनंतर शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट, म्हणाले…

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेल त्यांच्या पुस्तकात काय लिहतात याची मी वाट पाहतो आहे. प्रपुल्ल पटेल यांना पराभवानंतरही मी तिकीट दिलं होतं. परंतु त्यांच्याकडे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे त्यांनी लोक पक्ष सोडून कसे जातात, यावर पुस्तक लिहावं. त्यांच्या घरावर ईडीचा छापा का पडला? यावर त्यांनी पुस्तक लिहावं. दिल्ली किंवा मुंबईत जी घरे आहेत, त्यातील किती मजले ईडीने ताब्यात घेतले आणि का घेतले तेही प्रफुल्ल पटेल यांनी पुस्तकात लिहावं, त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : त्यांच्या धरसोडवृत्तीमुळे ‘तो’ निर्णय घेतला; अजितदादांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार म्हणतात…

- Advertisement -

माझा नकार बघून ते भाजपासोबत गेले नाहीत

2004मध्येच आम्ही भाजपासोबत जाणार होतो, प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 2004 साली जाणार होतो, हे अशक्य असं मी म्हणणार नाही. त्यावेळी पटेल माझ्या घरी येऊन काही तास थांबले होते. भाजपासोबत गेलं पाहिजे, वाजपेयींसोबत गेलं पाहिजे, असा आग्रही विचार त्यांनी माझ्यासमोर मांडला. अनेकवेळा ते तास न् तास मला सांगत होते. पण ती गोष्ट स्वीकारणे मला शक्य नव्हते. तुम्ही भाजपासोबत जाऊ शकता, माझा गैरसमज होणार नाही, असा सल्ला मी त्यांना दिला. पण माझा नकार बघून ते थांबले, असा दावा शरद पवार यांनी केला. त्यांनी असेही सांगितले की, त्यानंतर निवडणूक झाली आणि पटेल यांचा पराभव झाला. परंतु पक्षाने त्यांना केंद्रात मंत्री केलं. पराभूत उमेदवारालाही पक्षाने केंद्रीय मंत्रीपद दिलं, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -