Homeमहाराष्ट्रShare Market : सलग 3 दिवस शेअर बाजार बंद राहणार; हे आहे...

Share Market : सलग 3 दिवस शेअर बाजार बंद राहणार; हे आहे कारण

Subscribe

गेल्या काही काळापासून शेअर बाजारमध्ये अनेक चढउतार पाहायला मिळाले आहेत. अशामध्ये आता 15 ते 17 नोव्हेंबर असे 3 दिवस शेअर बाजार बंद राहणार असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : यंदाच्या आठवड्यात शेअर बाजारात अनेक चढ उतार पाहायला मिळाले. अमेरिकेत निवडणूक, अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच देशात सुरू असलेल्या निवडणुका यांमुळे बाजारात अनेक घडामोडी घडल्या. पण आता शुक्रवार, 15 तारखेपासून 3 दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. दरम्यान, गुरुवारी (14 नोव्हेंबर) आठवड्याभरातील चढउतारानंतर शेअर बाजारात फ्लॅट क्लोजिंग झाली. यावेळी सलग सहाव्या दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. आता शेअर बाजार हा पुढच्या आठवड्यात म्हणजेच सोमवारी, 18 नोव्हेंबरला पुन्हा उघडणार आहे. (Share market long holiday for 3 days 15 to 17 Nov)

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारताच गडकरींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य, म्हणाले… 

15 नोव्हेंबरला गुरु नानक जयंती असल्याकारणाने देशभरातील बँका तसेच शेअर बाजार बंद राहणार आहेत. त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 3 दिवस सलग बँका आणि शेअर बाजार बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीत 15 नोव्हेंबर रोजी बँकांना सुट्टी असल्याचे नमूद केलेले आहे. तसेच, पुढच्या आठवड्यात 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणुका असल्याने राज्यातील बँका तसेच शेअर बाजारला सुट्टी असणार आहे.

आठवडाभरातील चढ-उतारानंतर शेअर बाजार बंद झाला तेव्हा फ्लॅट क्लोजिंग झाली. निफ्टी 26 अंकांनी घसरून 23,532 वर बंद झाला तर सेन्सेक्स 110 अंकांनी घसरून 77,580 वर बंद झाला आहे. गुरुवारी, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 कंपन्यांचे शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळले. तर, 13 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. तसेच, निफ्टीत 50 शेअर्सपैकी 29 कंपन्यांचे शेअर्स हे तोट्यासह बंद झाले. तर, तर इतर 21 कंपन्याचे शेअर्स हे वाढीसह झाले. त्यामुळे आता सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतर या 3 दिवसांच्या सुट्टीचा परिणाम कसा होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


Edited by Abhijeet Jadhav