Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत Share Market: शेअर बाजारात परतली तेजी; गुंतवणूकदारांच्या संपत्तीचा आलेख चढता

Share Market: शेअर बाजारात परतली तेजी; गुंतवणूकदारांच्या संपत्तीचा आलेख चढता

Subscribe

तुम्ही शेअर बाजाराशी निगडीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात होत असलेल्या चढ-उतारानंतर आज 21 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात चांगलीच तेजी पहायाला मिळाली आहे.

मुंबई : तुम्ही शेअर बाजाराशी निगडीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात होत असलेल्या चढ-उतारानंतर आज 21 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात चांगलीच तेजी पहायाला मिळाली आहे.
मागील आठवड्यापेक्षा आज शेअर बाजारांमध्ये तेजी परत आली. जेथे बीएसई सेन्सेक्स 267 अंकांनी वाढून बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 19,400 च्या जवळ पोहोचला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये अधिक खरेदी दिसून आली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 3.47 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.(Share Market The stock market is booming again Ascending graph of investor wealth)

हेही वाचा : खबरदार! समृद्धी महामार्गावर रील्स बनवाल तर…

अशी झाली आज शेअर बाजारात उलाढाल

- Advertisement -

आज रेंज-बाउंड ट्रेडमध्ये, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 267.43 अंकांनी किंवा 0.41 टक्क्यांनी वाढून 65,216.09 वर बंद झाला. दिवसभरात तो 387.16 अंकांनी म्हणजेच 0.59 टक्क्यांनी वाढून 65,335.82 वर पोहोचला. त्याच वेळी, NSE निफ्टी 83.45 अंकांनी किंवा 0.43 टक्क्यांनी वाढून 19,393.60 वर बंद झाला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बीएसई बेंचमार्क 202.36 अंकांनी किंवा 0.31 टक्क्यांनी घसरून 64,948.66 वर बंद झाला होता. निफ्टी 55.10 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी घसरून 19,310.15 वर बंद झाला.

हेही वाचा : राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; उद्धव ठाकरे- संजय राऊत यांना जामीन

कुठे चढ तर कुठे उतार

- Advertisement -

आज दिवसभरात विविध शेअरमध्ये काही प्रमाणात चढ तर काही प्रमाणात उतार अशी स्थिती दिसून आली, यामध्ये पॉवरग्रीडच्या शेअर दरात 2.76 टक्के, बजाज फायनान्स 2.702 टक्के, इंडसइंड बँक 2.06 टक्के, भारती एअरटेल 1.92 टक्के, एनटीपीसी 1.51 टक्के, आयटीसी 1.31 टक्के, बजाज फिनसर्व 1.12 टक्के, इन्फोसिस 1.10 टक्के, नेस्ले 1.04 टक्के, टाटा स्टील, 0.99 टक्के, टीसीएस 0.95 आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, रिलायन्सच्या शेअर दरात 1.50 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 0.87 टक्के, एसबीआय 0.28 टक्के, मारुती सुझुकी 0.24 टक्क्यांची घसरण दिसून आली.

- Advertisment -