घरताज्या घडामोडीपूरग्रस्तांच्या मदतीला पहिल्याच दिवशी जाण्याची इच्छा मात्र राज ठाकरे म्हणाले..., शर्मिला ठाकरेंचा...

पूरग्रस्तांच्या मदतीला पहिल्याच दिवशी जाण्याची इच्छा मात्र राज ठाकरे म्हणाले…, शर्मिला ठाकरेंचा खुलासा

Subscribe

पूरग्रस्त भागात मनसेकडून मदत कार्य वेगाने करण्यात येत असून मुंबईतून मदतीचे ट्रक भरुन कोकणात

राज्यात अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली कोल्हापूरमधील काही भागात अजूनही पुराचे पाणी आहे. चिपळूण, सांगली, कोल्हापूरमध्ये पुराने तर रायगड, सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. पूरग्रस्तांना राजकीय पक्षांकडून मदतीचा ओघ सुरुच आहे. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला मनसेही पहिल्या दिवसापासून धावून गेली आहे. अशाच पूरग्रस्तांच्या मदतीला पहिल्याच दिवशी जाण्याची इच्छा होती मात्र राज ठाकरे म्हणाले पहिले मदत कार्य करावी यामुळे जाता आले नाही असा खुलासा राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केला आहे.

कोल्हापूर, सांगली, चिपळूणमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाल्यावर पहिल्याच दिवशी नागरिकांच्या मदतीला जाणार होतो मात्र पूरग्रस्तांना आधी मदत मिळाली पाहिजे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले यामुळे आम्ही जाणं टाळलं असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. पूरग्रस्त भागाला भेट दिली असतील तर लोकांच्या मदत कार्यामध्ये अडथळे निर्माण झाले असते. मनेस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कायम उभी असल्याचेही शर्मिला ठाकरेंनी सांगितले. पूरग्रस्त भागात मनसेकडून मदत कार्य वेगाने करण्यात येत असून मुंबईतून मदतीचे ट्रक भरुन कोकणात पाठवलं असल्याचे मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. तसेच तिथल्या पोलिसांनी फोन करुन मनसेची मदत आली असल्याचेही फोन करुन माहिती दिली असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पूरग्रस्त भागातील नदीची खोली वाढवली पाहिजे यामुळे पुराचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. तसेच धरणातील पाण्याचा विसर्ग करताना राज्य सरकारने गावकाऱ्यांना आधी सूचित केलं पाहिजे असेही शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. पूरग्रस्त भागातील गाव दत्तक घ्यायचे झाल्यास त्याबाबत राज ठाकरे निर्णय घेतली असेही शर्मिला ठाकरे यांनी नमूद केलं आहे.

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधत आहेत. तसेच पक्ष बळकट करण्याबाबत आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी तयारी सुरु करण्याचे निर्देश राज ठाकरे यांनी दिले आहेत. अमित ठाकरे यांना नाशिकच्या महानगरपालिका निवडणूकीची जबाबदारी देण्यात आली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -