घरमहाराष्ट्र'ना खाऊंगा ना खाने दुंगा', म्हणणाऱ्या भाजपने या नेत्यांना दिली क्लिन चिट;...

‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’, म्हणणाऱ्या भाजपने या नेत्यांना दिली क्लिन चिट; थरुर यांच्या यादीत नारायण राणेही

Subscribe

नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी देशभरातील आठ बड्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची कुंडली मांडणारे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक खासदार भावना गवळी, आमदार यामिनी जाधव, प्रताप सरनाईक, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचेही नाव यादीत आहे.

हे सर्व कायद्याच्या समोर समान आहेत. मग ना खाऊंना ना खाने दुंगा या घोषणेवर नेहमीच आश्चर्य व्यक्त केले जाते. मला वाटते ही घोषणा गोमांस बद्दल असावी, अशी मिश्किल टिप्पणी कॉंग्रेस नेते थरूर यांनी ट्वीटमध्ये केली आहे.

- Advertisement -

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. ते सध्या सीबीआय कोठडीत आहेत. सिसोदिया यांच्या अटकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ना खाऊंना ना खाने दुंगा हा नारा वारंवार दाखला म्हणून दिला जात आहे. त्यावर निशाणा साधत कॉंग्रेस नेते थरुर यांनी हे ट्विट केले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपमध्ये गेले तपास थांबला

- Advertisement -

नारायण राणे यांच्यावर ३०० कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रींगचा आरोप आहे. त्यांनी भाजप प्रवेश केला आणि याप्रकरणाची चौकशी थांबली. सुवेंदू अधिकारी हे नारदा घोटाळ्यात आरोपी आहेत. त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांची चौकशी बंद झाली. लाचखोरीचा आरोप असलेले हेमंता बिस्वा शर्मा यांनी भाजप प्रवेश केला आणि त्यांच्याविरोधातील तपास बंद करण्यात आला, असे कॉंग्रेस नेते थरुर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

भाजपला पाठिंबा आणि तपास गुंडाळला
खासदार भावना गवळी ह्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत्या. त्यांना ईडीने पाच वेळा चौकशीचे समन्स बजावले होते. त्या चौकशीला हजर झाल्या नाहीत. आता भावना गवळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. यशवंत जाधव व यामिनी जाधव यांच्याविरोधात ईडीची चौकशी सुरु होती. हे दोघेही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांच्या चौकशीचे पुढे काय झाले?, असा प्रश्न कॉंग्रेस नेते थरुर यांनी ट्विटमध्ये उपस्थित केला आहे. तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मनी लॉंड्रींगचा तपास सुरु होता. तेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यांच्याविरोधातील तपास बंद झाला आहे.

पंतप्रधनांकडून सत्कार

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येड्डूरप्पा यांच्यावर लाचखोरीचा आरोप आहे. त्यांचा सत्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे, असे कॉंग्रेस नेते थरुर यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -