‘ती भांडखोर आहे…’, रुपाली ठोंबरेंबाबत शरद पवारांचे स्पष्ट वक्तव्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रुपाली ठोंबरे यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्पष्टच बोलले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रुपाली ठोंबरे यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्पष्टच बोलले आहेत. ‘ती फार भांडखोर आहे. पोलीस काही बोलू लागले तर ती थेट त्यांच्या अंगावर जाते’, असे वक्तव्य शरद पवार यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्याबद्दल केले. (She Is Very Quarrelsome Sharad Pawar Talk On Rupali Thombare)

शरद पवार यांची आज पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्याबद्दल विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना “कुणाविषयी तुम्ही बोलताय? ती भांडखोर आहे फार. पोलीस काही बोलू लागले तर ती थेट त्यांच्या अंगावर जाते. तिला आवरावं लागतं”, असे शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर सगळेच हसू लागले.

रूपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या मानल्या जातात. रूपाली ठोंबरे या माजी नगरसेविका आहेत. रूपाली पाटील यांनी डिसेंबर २०२१ मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसेच्या फायरब्रँड नेत्या अशी रूपाली पाटील यांची ओळख होती. त्यांनी राज ठाकरेंना एक पत्र लिहून पक्ष सोडला. त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या.

कोण आहेत रूपाली ठोंबरे पाटील?

रुपाली पाटील ठोंबरे या तरुण-तरुणी, महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष काम करणे हे त्यांचे कौशल्य आहे. रूपाली ठोंबरे पाटील या पुणे मनपात मनसेच्या नगरसेविका होत्या. २०१७ मध्ये पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक १५ मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी गरोदर असून गल्लीबोळात प्रचार करुन त्यांनी लक्ष वेधले होते.


हेही वाचा – खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल, आव्हाडांनी व्यक्त केला संताप