घरमहाराष्ट्रशीना बोरा अजूनही जिवंतच, पुरावेही समोर आलेत; वकिलांनी दिली माहिती

शीना बोरा अजूनही जिवंतच, पुरावेही समोर आलेत; वकिलांनी दिली माहिती

Subscribe

शीना बोरा हत्याकांड प्रकरणी आज सुनावणी झाली. सुनावणीनंतर इंद्राजी मुखर्जी यांचे वकिल रणजीत सांगळे यांनी माध्यमांना ही माहिती दिली. 

मुंबई – शीना बोरा हत्याकांडात (Sheena Bora Murder Case) आज नवा खुलासा बाहेर आला आहे. शीना बोरा आजही जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जी यांनी केला आहे. तसंच, राहुल मुखर्जी आणि शीना बोरा २४ एप्रिल २०२१ नंतरही संपर्कात होते, असं इंद्राजी मुखर्जी म्हणाल्या आहेत. शीना बोरा हत्याकांड प्रकरणी आज सुनावणी झाली. सुनावणीनंतर इंद्राजी मुखर्जी यांचे वकिल रणजीत सांगळे यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

हेही वाचा – बॉम्बे हायकोर्टाचे महाराष्ट्र हायकोर्ट करा, माजी न्यायाधीशांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

- Advertisement -

रणजीत सांगळे म्हणाले की, “शीना बोरा आजही जिवंत आहे, असा आमचा दावा आहे. सष्टेंबर-ऑक्टोबर २०१२ पर्यंत ते दोघे संपर्कात असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. शीना बोराला भेटणारा शेवटचा व्यक्ती हा राहुल मुखर्जी होता. त्यामुळे ती कुठं आहे, हे राहुल मुखर्जी सांगू शकतो. मात्र, ती जिंवत असल्याचा आमचा दावा आहे.”

शीना बेपत्ता झाल्यानंतर २५ आणि २६ एप्रिल २०१२ रोजी श्यामवर रॉय आणि राहुल मुखर्जी यांचे तिच्याशी दोनवेळा फोनवर संभाषण झाले. २ मे रोजी सुद्धा त्यांनी संपर्क केला होता. मात्र, याबाबत पोलिसांसमोर किंवा सीबीआयसमोर किंवा कलम १६४ अंतर्गत न्यायालयात दिलेल्या जबाबात त्याने असा कोणताही उल्लेख केला नाही. त्याला त्याबाबत विचारले असता, असे संभाषण झाल्याचे आठवत नसल्याचे त्याने सांगितले”, असेही सांगळे यांनी सांगितलं.

- Advertisement -

राहुलने शीनाबरोबर लग्न केल्याचं खोटे विवाह प्रमाणपत्र बनवलं होतं. त्याचीही उलटतपासणी कोर्टात झाली. तेव्हा ते प्रमाणपत्र खोटं असल्याचं सिद्ध झालं. अनेक पुरावे समोर येत आहेत. मात्र, राहुल उत्तरं द्यायला टाळाटाळ करतो. मला माहित नाही, मला आठवत नाही, एवढंच तो बोलतो, अशीही माहिती रणजीत सांगळे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -