शीना बोरा गुवाहाटीत राहते, वकिलाकडून मोठा दावा; सीबीआय म्हणते सीसीटीव्ही फुटेज…

Sheena Bora Murder Case | सविना बेदी यांनीही ती जिवंत असल्याचा दावा केला आहे. सविना बेदी या मुखर्जी परिवाराच्या निकटवर्तीय असून पेशाने वकील आहेत.

sheena bora

मुंबई – शीना बोरा हत्याप्रकरणात आज मोठा खुलासा समोर आला आहे. इंद्राणी मुखर्जी हिने वकिलांमार्फत शीना बोरा जिवंत असल्याचं सांगितलं होतं. आता वकील सविना बेदी यांनीही शीना बोरा जिवंत असल्याचा दावा कोर्टात केला आहे. मात्र, सविना बेदी यांनी केलेला हा दावा सीबीआयने फेटाळून लावला. तसंच, यासाठी विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचीही गरज नसल्याचं सीबीआयने म्हटलं आहे.

हेही वाचा – शीना बोरा अजूनही जिवंतच, पुरावेही समोर आलेत; वकिलांनी दिली माहिती

2012 साली शीना बोराची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास अद्यापही चालू आहे. याप्रकरणाच्या सुनावणीत इंद्राजी मुखर्जी हिने शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला होता. आता सविना बेदी यांनीही ती जिवंत असल्याचा दावा केला आहे. सविना बेदी या मुखर्जी परिवाराच्या निकटवर्तीय असून पेशाने वकील आहेत.

5 जानेवारी रोजी सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास शीना बोरा गुवाहाटी विमानतळावर दिसली होती, असं सविना बेदी म्हणाल्या आहेत. ती मी हाकही मारली, मात्र ती तिथून पसार झाली. तिचा व्हिडीओही काढला असल्याचं सविना बेदी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे गुवाहाटीतील विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा – शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जी अखेर साडे सहा वर्षांनंतर तुरूंगाबाहेर

परंतु, सविना बेदी यांनी केलेले सर्व आरोप सीबीआयने फेटाळून लावले आहेत. सीबीआय जिवंत नसल्याचे शास्त्री आदार आहेत, तिचा मृत्यू झाला आहे. त्याबाबतचे सक्षम पुरावे आहेत, असं सीबीआयने म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण

शीना बोराची हत्या 24 एप्रिल 2012 रोजी करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर राय याला बेकायदेशीर हत्या बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीत या हत्याकांडाचा 2015 मध्ये उलगडा झाला. इंद्राणीने आपला आधीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांना बरोबर घेऊन शिनाची हत्या केली. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट पनवेलजवळ 25 एप्रिल 2012 रोजी लावल्याचे समोर आले होते. शिना ही इंद्राणीच्या पहिल्या पतीपासूनची मुलगी होती. याप्रकरणी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी यालाही  कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती.