घरताज्या घडामोडीशीतल आमटेंच्या मृत्यूच कारण आलं समोर; शवविच्छेदनाचा अहवाल

शीतल आमटेंच्या मृत्यूच कारण आलं समोर; शवविच्छेदनाचा अहवाल

Subscribe

महारोगी सेवा समितीच्या सीईओ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूबाबत एक माहिती समोर आली आहे.

महारोगी सेवा समितीच्या सीईओ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूबाबत एक माहिती समोर आली आहे. डॉ. शीतल आमटे यांचा मृत्यू श्वास नलिकेत अन्न अडकल्यामुळे गुदमरुन झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार समोर आले आहे. पण, प्राणघातक इंजेक्शन, व्हिसेरा, मोबाईल, लॅपटॉप, टॅब याचा चंद्रपूर आणि नागपूरातील रासायनिक परिक्षणाचा अहवाल तथा मुंबईच्या न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल येणे बाकी आहे. या दोन्ही प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती जिल्हा पोलिसांनी दिली आहे.

मृत्यू प्रकरणाचा शोध सुरुच

शीतल आमटे करजगी यांच्या मृत्यू प्रकरणाला आज १ वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणाचा शोध लागलेला नाही. ३० दिवसानंतरही त्यांच्या मृत्यू प्रकरणाचा शोध सुरु असल्याची माहिती अधीक्षकांनी दिली आहे. तसेच डॉ. शीतल आमटे या एक ते दीड वर्षापासून मानसिक तणावात होत्या. त्यांच्यावर नागपुरातील एका मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरु होते, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या कालावधीत जून महिन्यात झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांना नागपूरच्या व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. त्यानंतर ३० नोव्हेंबरला त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी त्यांनी नागपुरातील नेहमीच्या औषधविक्रेत्याकडून कुत्रे अल्सरच्या त्रासाने पीडित असल्याचे कारण सांगून नेक्युरोन, केसोल आणि मेडझोल असे तीन प्रकारचे प्राणघातक इंजेक्शन (लेथल) प्रत्येकी पाच नग मागविले. विशेष म्हणजे यापूर्वी हे इंजेक्शन आनंदवनातील रूग्णालयात वापरले गेलेले नाही.

ज्यावेळी शीतल आमटे यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या खोलीतून नेक्युरोन इंजेक्शनचे अॅम्पुल आणि सिरिंज मिळाले. तर शीतल यांच्या उजव्या हातावर इंजेक्शनचे मार्क दिसून आले. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरुन तीन मोबाइल, एक लॅपटॉप, एक टॅबलेट, मुद्देमाल, व्हिसेरा ताब्यात घेतला आहे. या सर्व वस्तू रासायनिक परिक्षणकामी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई या ठिकाणी पाठविले असून याचे अहवाल येणे बाकी आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – एमपीएससीतून सरकारी नोकरीच्या खुल्या व ओबीसी वर्गाच्या संधी कपात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -