तुमचे वडील महान, मग तुम्ही एवढे कसे लहान?, शिंदे गटाची ठाकरेंवर टीका

uddhav thackeray

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिले. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात आधीपासून सुरु असलेला वाद आता आणखीच तीव्र झाला आहे. दोन्ही गटाकडून आता आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान, तुमचे वडील महान, मग तुम्ही एवढे लहान कसे?, असा सवाल विचारत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पक्ष गेला, चिन्ह गेले, पुरते कफल्लक झाले.. चोर चोर ओरडत सुटले, अगदी क्षुल्लक झाले.. लोकशाही बुडाली, शेण खाल्ले, ही काय भाषा आहे? माजुर्डेपणाला कायद्याने दिलेली ही तर शिक्षा आहे. तुमचे वडील महान, मग तुम्ही एवढे लहान कसे? एका जबरदस्त फटक्याने झाले तुमचे भिजलेले ससे, असं ट्वीट करत शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

जो ना भगवान राम का, वो ना किसी काम का – आशिष शेलार

आज मतांसाठी जोगवा मागण्याची, दारोदार फिरण्याची वेळ का आली. हिंदी भाषिक समाज भाजपा सोबतच आहे आणि तो भाजपा सोबतच राहिल. भाजपाने मुंबईत चौपाल सुरू केले तेव्हापासूनच उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. त्यामुळे आज ते उत्तर भारतीय समाजाच्या बैठका घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगतो की, ”है तयार हम!”, तसेच आम्हाला याची कल्पना आहे की, हिंदी भाषिक जाणतात, जो ना भगवान राम का वो ना किसी काम का!, असा टोला आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लागावला.


हेही वाचा : जो ना भगवान राम का, वो ना किसी काम का, आशिष शेलारांचा ठाकरेंना टोला