‘त्या’ व्हिडीओप्रकरणी शीतल म्हात्रे अ‍ॅक्शन मोडवर; म्हणाल्या, बहिण-भावाच्या नात्याला…

Sheetal Mhatre Reaction on Viral Video | मध्यरात्री शीतल म्हात्रे, प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे यांनी दहीसर पोलीस ठाण्यात जाऊन यासंबंधित तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल केले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

sheetal mhatre

Sheetal Mhatre Reaction on Viral Video | मुंबई – प्रचारसभेतील एक व्हिडीओ एटीड करून व्हायरल केल्याप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेतील शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या व्हिडीओ प्रकरणी त्यांनी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवासनेच्या कार्यकर्त्यांवर रोख ठेवला आहे. तसंच, याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मातोश्री या फेसबूक पेजवरून शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मॉर्फ केला असल्याचा दावा शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांनी केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच शीतल म्हात्रे यांनी संताप व्यक्त करत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला. तसंच, मध्यरात्री शीतल म्हात्रे, प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे यांनी दहीसर पोलीस ठाण्यात जाऊन यासंबंधित तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल केले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

“राजकारणात मला अनुभव आले. पुरुषी विचार कसा असतो? एखादा पुरुष राजकारणात महिलांना कसा वागवतो? मी माझा आत्मसन्मान, मी माझं जीव, आणि करिअर पणाला लावलं. आज त्याच स्त्रीबद्दल बोलण्यासारखं काही नसतं. ती ज्या पद्धतीने काम करते ते कुठेतरी खटकत असतं. तिला अडकवण्यासाठी तिच्या चारित्र्यावर बोलणं अतिशय सोपं असतं. कोणीतरी इतक्या खालच्या पातळीवरचा विचार कसं करू शकतं? जी कोणाची तरी आई आहे, बहिण आहे, बायको आहे. अशा एका घरंदाज स्त्रीचा व्हिडीओ टाकणं स्त्री म्हणून मनाला वेदना देणारं आहेत. हे कोण आहे याची सर्वांना कल्पना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीला अशापद्धतीने बदनमा केलं जातं. बहिण-भावाचं नातं असलेल्या एखाद्या स्त्रीला आणि पुरुषाला अशा पद्धतीने समाज विकृत नजरेने पाहतोय यामागे कोणाचं डोकं आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. त्यांच्याकडे काहीच करण्यासारखं नाहीय म्हणून ते एवढ्या पातळीपर्यंत आले आहेत,” अशी प्रतिक्रिया शीतल म्हात्रे यांनी दिली.