घरताज्या घडामोडी'मातोश्रीतून युवा सेनेच्या टीमला फोन केले गेले आणि...' नरेश म्हस्केंचे अप्रत्यक्षरित्या ठाकरेंवर आरोप

‘मातोश्रीतून युवा सेनेच्या टीमला फोन केले गेले आणि…’ नरेश म्हस्केंचे अप्रत्यक्षरित्या ठाकरेंवर आरोप

Subscribe

शिवसेना आशीर्वाद यात्रेतील एक व्हिडीओ एटीड करून व्हायरल केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशातच या व्हिडीओ प्रकरणी शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवासनेच्या कार्यकर्त्यांवर अप्रत्यक्षरित्या रोख ठेवला आहे.

शिवसेना आशीर्वाद यात्रेतील एक व्हिडीओ एटीड करून व्हायरल केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशातच या व्हिडीओ प्रकरणी शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवासनेच्या कार्यकर्त्यांवर अप्रत्यक्षरित्या रोख ठेवला आहे. त्यामुळे शिवसेना आणि ठाकरे गटात पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Sheetal Mhatre Viral Video Naresh Mhaske Thackeray Matoshree)

व्हायरल व्हिडीओप्रकरणी शितल म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मातोश्री या फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, शीतल म्हात्रे यांच्यानंतर नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ‘अंधेरी उपविभाग प्रमुख अशोक मिश्रा या दोघांना पकडले गेले आहे. मात्र या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे. त्याचाही शोध घेतला पाहिजे, याची मागणी आम्ही मुंबई पोलिस आयोक्तांकडे करणार आहोत. युवा सेनेच्या टीमला फोन केले गेले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याचे आदेश देण्यात आले, अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, शितल म्हात्रे यांचा व्हिडिओ फॉरवर्ड करून व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अशोक मिश्रा आणि मानस कुवर असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ व्हिडिओ असल्याचा आरोप करत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण

- Advertisement -

शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रेंचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा प्रकरा समोर आला आहे. कांदिवली येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे. यानंतर आता काँग्रेस कार्यकर्ता राजेश गुप्ता याला अटक देखील करण्यात आली आहे.


हेही वाचा – मातोश्री पेजवरुन ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, मास्टर माईंडलाही अटक करावी, शीतल म्हात्रेंची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -