तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण: शिझान खानची जामिनासाठी वसई कोर्टात धाव

Actor Sheezan Khan

वसईः तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या शिझान खानने जामीनासाठी वसई कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यावर शुक्रवारी पोलीस आपली बाजू मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही बाजूकडून युक्तीवाद सुरु होणार आहे.

अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्याप्रकरणी तिचा प्रियकर शिझान खानचा जामीन अर्ज वसई कोर्टाने १३ जानेवारीला फेटाळून लावला होता. त्यानंतर शिझानने जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण, हायकोर्टाने त्याचा जामीन फेटाळून लावला होता. दरम्यानच्या काळात शिझान खानच्या वतीने मुंबई हायकोर्टात गुन्हा रद्द दाखल करण्याची याचिका दाखल केली. तसेच वालीव पोलिसांनी २० फेब्रुवारीला वसई कोर्टात चार्जशिट दाखल केली आहे.

चार्जशिट दाखल झाल्याने शिझान खानच्यावतीने बुधवारी वसई कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
आज या अर्जावर सुनावणी होणार होती. पण, वालीव पोलिसांनी आपले म्हणणे न मांडल्याने कोर्टाने त्यांना उद्या (शुक्रवार) म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. पोलिसांचे म्हणणे सादर झाल्यानंतर दोन्ही बाजूंकडून वकिल युक्तीवाद करणार आहेत. युक्तीवाद संपल्यानंतर कोर्ट जामिनावर आपला निर्णय देणार आहे. त्यामुळे शिझानचा तुरुंगातील मुक्काम सध्या वाढणार आहे.


हेही वाचा : तुम्ही केलेल्या संघर्षाला यश.., एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पवारांनी दिल्या