घरमहाराष्ट्रशीझान खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावर ११ जानेवारीला सुनावणी

शीझान खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावर ११ जानेवारीला सुनावणी

Subscribe

Tunisha Sharma Suicide Case | तुनिषाच्या वकिलांनी यावर बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतली. ती मान्य करत न्यायाधीश देशपांडे यांनी पुढील सुनावणी येत्या ११ जानेवारीला होईल, असे सांगितले. त्यामुळे सध्या ठाणे तुरुंगातील शीझानचा मुक्काम वाढला आहे. या सुनावणीसाठी तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा आणि बहिण कोर्टात हजर होती.

वसई – टिव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्याप्रकरणी शिजान खानने जामिनासाठी अर्ज केला असून वसई कोर्टात त्याच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. मात्र, तुनिषाच्या वकिलांनी बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतल्याने कोर्टाने पुढिल सुनावणी ११ जानेवारीला ठेवली आहे.

हेही वाचा – ‘तिने’ माझ्याकडून 3 महिन्यांत 3 लाख घेतले; तुनिषाच्या आईचा खुलासा

- Advertisement -

सोमवारी दुपारी जिल्हा सत्र न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांच्यापुढे शीझान खानचे वकिल शैलेंद्र मिश्रा यांनी तब्बल दीड-दोन तास आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी आत्महत्याप्रकरणात लव्ह जिहाद, हिजाब, उर्दू शिकण्याची जबरदस्ती आदी आरोप फेटाळून लावत शीझान निर्दोष असल्याचा दावा केला. त्याचबरोबर मिश्रा यांनी एक खळबळजनक दावा केला असून त्यात तुनिषा शर्मा गेल्या महिन्याच्या २१ ते २३ डिसेंबर असे तीन दिवस तिचा जिम ट्रेनर अलीसोबत गेल्याची माहिती कोर्टापुढे ठेवली. तुनिषाची अलीसोबत डेटिंग अॅपवर ओळख झाल्याची माहितीही त्यांनी कोर्टाला दिली. त्यामुळे आता तुनिषा आत्महत्या प्रकरणाला वेगळेच वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


शीझानचे वकिल शैलेंद्र मिश्रा यांनी जिया खान आत्महत्याप्रकरणाचा हवाला देत त्यात सूरज पंचोलीला जामीन मिळाल्याचे सांगत जामीन मिळावा, अशी विनंती कोर्टाला केली. दरम्यान, तुनिषाच्या वकिलांनी यावर बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतली. ती मान्य करत न्यायाधीश देशपांडे यांनी पुढील सुनावणी येत्या ११ जानेवारीला होईल, असे सांगितले. त्यामुळे सध्या ठाणे तुरुंगातील शीझानचा मुक्काम वाढला आहे. या सुनावणीसाठी तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा आणि बहिण कोर्टात हजर होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -