मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल 1 फेब्रुवारीपासून कोकण दौऱ्यावर असून, काल रायगड जिल्ह्यात झालेल्या सभांमधून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. या टीकेला भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मळमळ, जळजळ आणि भाजपा व्देष, त्यामुळे ना ग्रामपंचायतसुद्धा जिंकण्याची वॉरंटी म्हणून हवी जनतेला मोदींची गॅरंटी असे लिहित ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Shelar On Uddhav Thackeray so people need Modis guarantee Shelars attack on Thackeray)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवशीय कोकण दौऱ्यावर आहेत. गुरुवारी (1 फेब्रुवारी) रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तटकरेंवर टीका करताना ते म्हणाले की, तटकरे जर मागच्या दाराने राज्यसभेत जात असतील तर त्यांना मोदींनी गेट आऊट असं म्हटले पाहिजे. अशा शब्दांत ठाकरेंनी तटकरेंवर हल्लाबोल केला. याआधी आगामी लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा देणाऱ्यांना मग नितीश कुमार का लागतात? असे म्हणतच वर्तमानपत्रात माजी मुख्यमंत्री सोरेन यांना अटक तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीनचिट अशा बातम्या छापून आल्या. तेव्हा जो सोबत येईल तो क्लीन आणि जो विरोधात असेल त्याला अटक अशी रणनीती भाजपची असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपवर जोरदार हल्ला केला.
पेण, रोहा, चौल…
काय मिळाला रायगडकरांचा
कौल?ना आपल्या हातात पक्ष
ना पक्षाचे निशाण
ना कुठला अजेंडा
ना हातात भगवा झेंडा
मळमळ, जळजळ आणि भाजपा व्देष
त्यामुळे ना ग्रामपंचायत सुध्दा जिंकण्याची वॉरंटीम्हणून हवी जनतेला मोदीजींची गँरेंटी!!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 2, 2024
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोदी गॅरंटीचा समाचार घेताना उद्धव म्हणाले की, अमूक-टमूक होगा, यह मोदी गॅरंटी है. भ्रष्टाचार करा भाजपात या, कुछ नही होगा, मोदी गॅरंटी है. तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल, तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद मिळेल. आरोप करणारे हेच, पक्षात घेणारे हेच, क्लीनचिट देणारे हेच, आणि जे सोबत येत नाहीत, म्हणजे नितीश कुमार भाजपासोबत गेले, ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि दुसऱ्या दिवशी, लालू प्रसाद आणि तेजस्वीला ईडीकडून नोटीस. तेव्हा मोदी गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला होता. हाच मुद्दा हेरत भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्ट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा : BMC Budget 2024 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प वाढला; 7 हजार 335 कोटी 68 लाखांची भर
ना आपल्या हातात पक्ष, ना पक्षाचे निशाण
भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांच्या केलेल्या पोस्टमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना लिहिले की, पेण, रोहा, चौल, काय मिळाला रायगडकरांचा कौल? ना आपल्या हातात पक्ष, ना पक्षाचे निशाण, ना कुठला अजेंडा, ना हातात भगवा झेंडा मळमळ, जळजळ आणि भाजपा व्देष त्यामुळे ना ग्रामपंचायतसुध्दा जिंकण्याची वॉरंटी, म्हणून हवी जनतेला मोदींची गँरेंटी असे लिहत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
हेही वाचा : Maratha Reservation : आता मुदतवाढ नाहीच, कोणत्याही परिस्थितीत आजच पूर्ण करा सर्वेक्षण
उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा भाजपवर मोदींवर हल्ला
कोकण दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज 2 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये असून, ते सध्या जाहीर सभेला संबोधित करत आहेत. या सभेतून त्यांनी पुन्हा एकदा मोदींवर हल्ला सुरू केला आहे.