घरमहाराष्ट्रराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार; भाजपकडून चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार यांना संधी

राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार; भाजपकडून चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार यांना संधी

Subscribe

विरोधी पक्ष शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर टीका चालवली होती. या पार्श्वभूमीवर तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज सकाळी ११ वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मार्गी लागत आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी पार पडेल

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उद्या मंगळवारी होत आहे. ऑगस्ट क्रांतिदिनाचा मुहूर्त साधत होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील तर शिंदे गटाकडून दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदिपान भुमरे हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळात नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी देत समतोल साधण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असून, दोन्ही बाजूकडून प्रत्येकी ९ असे एकूण १८ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत अपक्ष आमदार आणि विधान परिषद सदस्यांचा समावेश नसल्याचे कळते. त्यामुळे प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची प्रतीक्षा करावी लागेल. प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि शिंदे यांना समर्थन देणारे अपक्ष आमदार यांनाही मंत्रिपदासाठी थांबावे लागू शकते. तर शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यात माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींच्या नावाचा समावेश असल्याचे उघड झाल्याने सत्तार यांच्या मंत्रिमंडळ समावेशाविषयी संभ्रम आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी अनुक्रमे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून दोघांकडून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले जात होते. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दोघांनी अनेक दिल्लीवाऱ्या केल्या. तरीही भाजप पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळत नसल्याने विस्तार रखडला होता. याशिवाय राज्यातील सत्तासंघार्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराविषयी अनिश्चितता होती. त्यामुळे विरोधी पक्ष शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर टीका चालवली होती. या पार्श्वभूमीवर तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज सकाळी ११ वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मार्गी लागत आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी पार पडेल.

भाजपने आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मंत्र्यांच्या यादीविषयी बराच खल करून नावे निश्चित केली आहेत. त्यानुसार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव लोणीकर यांच्या नावावर शिक्कमोर्तब केले आहे. याशिवाय संजय कुटे, रवींद्र चव्हाण, देवयानी फरांदे यांची नावे चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ३९ आमदारांनी समर्थन दिले. त्यात सात माजी मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदिपान भुमरे, संजय राठोड यांना आज मंत्रिपदाची शपथ दिली जाईल, असे समजते. तसेच शंभूराज देसाई, तानाजी सावंत, संजय शिरसाट यांनाही पहिल्या टप्प्यात संधी दिली जाऊ शकते.

- Advertisement -

संभाव्य मंत्री

भाजप : चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, संभाजी निलंगेकर पाटील, सुभाष देशमुख, देवयानी फरांदे,  रवींद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर, विद्या ठाकूर, मदन येरावार, महेश लांडगे, सुरेश खाडे, माधुरी मिसाळ, योगेश सागर, अशोक उईके
शिंदे गट : दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदिपान भुमरे, संजय राठोड, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय शिरसाट, बच्चू कडू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -