कुटुंबाला होणाऱ्या त्रासामुळे शिंदे गटात जातोय, अर्जुन खोतकर हतबल अन् भावूक

अडीच वर्षांनंतर रावसाहेब दानवे आणि आम्ही बोललो, दुश्मन जरी असला तरी चहा घ्यायला या बोलला तर का नाही जायचं, म्हणून मी गेलो, असं म्हणत तुम्ही लोकसभेला मला समर्थन द्या, त्यावर दानवे म्हणाले, तुम्हाला कशी जागा सुटेल, तिथे मी सध्या खासदार असल्याचं सांगितलं

Arjun Khotkar

जालना: परिस्थितीनुसार हा निर्णय घेत आहे. कुटुंबाला होणाऱ्या त्रासामुळे शिंदे गटात जातोय, मी शिंदेंचं समर्थन केलं आहे. शिंदे गटात जाण्यासाठी ठाकरेंकडे परवानगी मागितली. पक्षप्रमुख म्हणून सहकाऱ्याला सेफ करणं गरजेचं आहे. अडचणीत आहात तर निर्णय घेऊ शकता, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचंही अर्जुन खोतकरांनी सांगितलं. अर्जुन खोतकरांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटात जात असल्याचं जाहीर केलंय. पण त्यांनी शिंदे गटात जाणं आपली हतबलता असल्याचंही दाखवून दिलंय.

अडचणीतला माणूस सहारा शोधतो, मी शिंदेंचा सहारा शोधलाय हे स्पष्टपणे सांगतोय. अडीच वर्षांनंतर रावसाहेब दानवे आणि आम्ही बोललो, दुश्मन जरी असला तरी चहा घ्यायला या बोलला तर का नाही जायचं, म्हणून मी गेलो, असं म्हणत तुम्ही लोकसभेला मला समर्थन द्या, त्यावर दानवे म्हणाले, तुम्हाला कशी जागा सुटेल, तिथे मी सध्या खासदार असल्याचं सांगितलं, तर मी हा मुद्दा शिंदे आणि फडणवीसांवर टाकण्याचा त्यांना सल्ला दिल्याचंही अर्जुन खोतकरांनी सांगितलंय. मी विधान परिषदेची कुठलीही अट ठेवली नसल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.

गेले आठ दिवसांपूर्वी आपल्या मायभूमीत जाऊन माध्यमांशी बोलेन, अशी विनंती मी आपल्या माध्यमातून केली होती. त्या पद्धतीने मी आज आपल्याशी बोलत आहे. 1990 ला मी पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीनं आमदार झालो. मी आजतागायत अत्यंत इमानेइतबारे पक्षाची सेवा करत आलेलो आहे. यात मी एकटाच नाही, तर आमचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून जिल्ह्यात शिवसेनेचं संघटन वाढवलं. सामान्य माणसानेसुद्धा तेवढाच विश्वास आमच्यावर टाकलाय, अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभेचं यश आमच्या पदरात टाकलं, त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो, असंही अर्जुन खोतकर म्हणालेत.

पक्ष नेतृत्वाचेही मी आभार व्यक्त करतो. जालना शुगर फॅक्टरी ही तापडियांनी विकत घेतली, तापडियांनी पहिल्यांदा 10 टक्के, त्यानंतर 25 टक्के रक्कम भरली. त्या काळात कारखाना घेण्यासाठी कोण इच्छुक आहे, याची चाचपणी केली असता, अजित सीडची निविदा आली होती, त्यांनी तो कारखाना 44 कोटी रुपयांना घेतला. कारखान्यात 75 टक्के रक्कम अजित सीड्नी वर्ग केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितापायी मी अजित सीड्समध्ये 7 कोटी रुपये गुंतवणूक केली, असंही अर्जुन खोतकर यांनी सांगितलंय.


हेही वाचाः मुंबईतून गुजराती, राजस्थानी गेल्यास ही आर्थिक राजधानी राहणार नाही; राज्यपालांचे वादग्रस्त विधान; विरोधक आक्रमक