घरमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकारने आत्मचिंतन करावे; दावोसवरून अजित पवार यांचा टोला

शिंदे-फडणवीस सरकारने आत्मचिंतन करावे; दावोसवरून अजित पवार यांचा टोला

Subscribe

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल. येथील तरुणांना रोजगार मिळत असेल तर आनंदच आहे. मात्र महाराष्ट्रातून मोठी गुंतवणूक राज्याबाहेर गेली. त्यामुळे लाखो तरुणांचा रोजगार गेला. त्याबाबतही शिंदे-सरकारने आत्मचिंतन करायला हवे. काही हजार कोटींचा एमओयू झाला आहे, असे सरकार सांगत आहे. प्रत्यक्षात किती प्रकल्प येतात हे कळेलच.

मुंबईः दावोसमधून महाराष्ट्रासाठी भरीव गुंतवणूक आली तर आनंदच आहे. पण महाराष्ट्रातील प्रकल्प परराज्यात जात असतील तर शिंदे-फडणवीस सरकारने आत्मचिंतन करायला हवे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल. येथील तरुणांना रोजगार मिळत असेल तर आनंदच आहे. मात्र महाराष्ट्रातून मोठी गुंतवणूक राज्याबाहेर गेली. त्यामुळे लाखो तरुणांचा रोजगार गेला. त्याबाबतही शिंदे-सरकारने आत्मचिंतन करायला हवे. काही हजार कोटींचा एमओयू झाला आहे, असे सरकार सांगत आहे. प्रत्यक्षात किती प्रकल्प येतात हे कळेलच. महाविकास आघाडीचे सरकार असताना मंत्री सुभाष देसाई, आदित्य ठाकरे हे दावोसला गेले होते. दावोसला कोणाला पाठवावे हा शिंदे-फडणवीस सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र महाराष्ट्रासाठी गुंतवणूक यायला हवी, असे अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारीत गोंधळ होणार याची कुणकुण आधीच मला लागली होती. डॉ. सुधीर तांबे यांनी का बंडखोरी केली हे बघावे लागेल. डॉ. सुधीर तांबे हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना मी स्वतः विचारेन की असे काय झाले की तुम्ही उमेदवारी अर्जच भरला नाही. ती जागा कॉंग्रेसला दिली होती. त्यांच्या उमेदवाराने गोंधळ केला. आता तेथे कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत कॉंग्रेस व शिवसेनेसोबत चर्चा करुनच निर्णय घेणार आहोत. शुभांगी पाटील यांनी पाठिंब्यासाठी मलाही फोन केला होता. मातोश्रीवरुन त्यांना पाठिंबा मिळाला आहे. ज्या उमेदवारामध्ये निवडून येण्याची ताकद आहे, त्यालाच पाठिंबा द्यावा, असे माझे मत आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्र भाषा हिंदी करावी का यावर अजित पवार म्हणाले, राष्ट्र भाषा हिंदी करावी की नाही यावर मतमतांतरे आहेत. पण महाराष्ट्राचा नागिरक म्हणून मला असे वाटते की हिंदी राष्ट्र भाषा व्हायला हवी. केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच पिक विम्याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -