घरमहाराष्ट्रशिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; 'या' तारखेचा मुहूर्त?

शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; ‘या’ तारखेचा मुहूर्त?

Subscribe

आता शिंदे कॅबिनेटचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा 5 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. पहिल्या विस्तारात शिंदे गटाच्या अनेक इच्छुकांना संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार का हे लवकरच समजणार आहे.

मुंबईः राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळातील सध्याच्या रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणे अपेक्षित आहे. 30 जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या एकनाथ शिंदे यांनी 9 ऑगस्ट रोजी प्रथमच त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. आता मंत्रिमंडळातील दुसऱ्या टप्प्यातील विस्तार हा दसऱ्याच्या मुहूर्तावर होण्याची शक्यता आहे.

5 ऑक्टोबरला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

महाराष्ट्र सरकारने आपल्या मंत्रिमंडळात 18 नवीन मंत्र्यांचा समावेश केलाय. त्यात बंडखोर शिवसेना गटातील प्रत्येकी 9 सदस्य आणि भारतीय जनता पक्षाच्या 9 आमदारांना स्थान देण्यात आलेय, त्यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या दोनने वाढवून 20 करण्यात आली. आता शिंदे कॅबिनेटचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा 5 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. पहिल्या विस्तारात शिंदे गटाच्या अनेक इच्छुकांना संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार का हे लवकरच समजणार आहे.

- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करणार

भाजप नेत्याने सांगितले की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करतील. नवीन आमदारांना सर्वसामान्यांच्या सेवेची संधी मिळू शकते आणि लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. त्यानंतर महिनाभरानंतर 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यात 9 मंत्री भाजपचे आणि 9 मंत्री एकनाथ शिंदे गटाचे होते. आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन त्यांना इच्छुक आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात मुंबई आणि मराठी चेहराच नाही

मंत्रिमंडळात संधी देण्यात आलेले संजय राठोड आणि सुधीर मुनगंटीवार (विदर्भ); गुलाबराव पाटील, दादा भुसे, गिरीश महाजन आणि विजयकुमार गावित (उत्तर महाराष्ट्र); अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, अतुल सावे आणि तानाजी सावंत (मराठवाडा); चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील व सुरेश खाडे (पश्चिम महाराष्ट्र); उदय सामंत आणि दीपक केसरकर (कोकण), तर रवींद्र चव्हाण (डोंबिवली) यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईतून केवळ भाजप आमदार मंगलप्रभात लोढा हे मंत्रिमंडळात आहेत.

- Advertisement -

हेही वाचाः महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांचं वादग्रस्त विधान; उत्तर भारताच्या मानसिकतेवर उपस्थित केला सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -