Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शिंदे सरकारचा ठाकरे सरकारला दणका; अजित पवारांनंतर 'यांचा' निधी रोखला

शिंदे सरकारचा ठाकरे सरकारला दणका; अजित पवारांनंतर ‘यांचा’ निधी रोखला

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोसळलेल्या महाविकास आघाडी सरकारला धक्क्यांवर धक्के देत आहे. सध्या राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे युतीचे सरकार आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोसळलेल्या महाविकास आघाडी सरकारला धक्क्यांवर धक्के देत आहे. सध्या राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे युतीचे सरकार आहे. या सरकारच्या स्थापनेनंतर एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारने मंजूर केलेले निधी रोखले. असातच आता कोल्हापूर महापालिकेसह (Kolhapur Municipal Corporation) कागल आणि मलकापूर नगरपालिकांना देण्यात आलेला निधी रोखला आहे. (shinde government withheld funds of kolhapur municipal corporation)

महाविकास आघाडी सरकारने कोल्हापूर महापालिकेसह कागल आणि मलकापूर नगरपालिकांसाठी 15 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मंजूक केला होता. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारने रोखला आहे. निधी रोखण्याचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित केलेल्या निधीचा आढावा घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. त्यानुसार महापालिका, नगरपालिकांचा निधी रोखला जात आहे. या आदेशापूर्वी ‘वर्क ऑर्डर’ झालेली असेल, तर मात्र हा निधी खर्च करता येणार आहे.

कोल्हापूर महापालिकेला मुलभूत सुविधांसाठी प्रत्येक 5 कोटी याप्रमाणे दोन वेळा एकूण 10 कोटीचा निधी दिला गेला. कागर नगरपालिकेला 3 कोटी 70 इतका निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी देण्यात आलेला. यासोबतच विशेष बाब म्हणून 1 कोटी 30 लाख निधी देण्यात आलेला. शिवाय, मलकापूर नगरपालिकेलाही २९ लाखांचा निधी दिला गेला. हा निधी थांबवण्याचे आदेश आता शिंदे सरकारने दिले आहे.

- Advertisement -

शिंदे सरकारने 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. दरम्यान, ज्या कामांना शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे, त्यापैकी बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. तसेच, ही कामे मार्च 2022 ते जून 2022 या कालावधीत मंजूर करण्यात आली होती. सत्तेत आल्यानंतर शिंदे सरकारने विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना लक्ष्य केल्याचे दिसते. कारण शिंदे सरकारने केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती दिली आहे.


हेही वाचा – ‘त्या’ कामांना स्थगिती देत शिंदे गटाचा विरोधी पक्षनेते अजित पवारांना दणका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -