घरमहाराष्ट्रशिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही लांबणीवर; नाराज आमदारांना यावेळी तरी संधी मिळणार?

शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही लांबणीवर; नाराज आमदारांना यावेळी तरी संधी मिळणार?

Subscribe

पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराप्रमाणे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार देखील लांबवीला जात आहे. पहिल्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील ज्या आमदारांना संधी मिळली नाही त्यांचा हिरमोड झाला.

शिवसेनेतून (shivsena) बंडाळी करत एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी भाजपशी हातमिळवणी केली. राज्यभरातील शिवसेनेच्या अनेक आमदारांनी शिंदे गटात उडी घेतली. राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले. दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीतून शिंदे गट आणि भाजप यांनी माघार घेतली असली तरी मुंबईसह राज्यातील इतर पालिका निवडणुकांसाठी शिंदे गट आणि भाजप जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान शिंदे सरकारला चार महिने पूर्ण झाले तरीही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झाला नाही. पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराप्रमाणे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार देखील लांबवीला जात आहे. पहिल्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील ज्या आमदारांना संधी मिळली नाही त्यांचा हिरमोड झाला. या आमदारांना दुसऱ्या मंत्रिमंडळात संधी मिळते का ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadanvis) यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. तर 9 शिंदे गटाचे आणि 9 भाजपाचे मंत्री आहेत. पण दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जात आहे. दरम्यान नाराज आमदारांकडे महामंडळांची जबाबदारी देण्यात येणार आहे. यामुळे या आमदारांची नाराजीसुद्धा दूर होईल आणि अध्यक्षपद मिळाल्याने ते कामालाही लागतील, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान राज्यातील महामंडळांची अध्यक्षपदे ही गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. ठाकरे सरकारनेही महामंडळांवर कोणाच्या नियुक्त्या केल्या गेल्या नव्हत्या. कोरोनामुळेही या नियुक्त्या रखडल्या होत्या. दरम्यान या सगळ्यावर मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा येत्या काही दिवसांत महामंडळ नियुक्त्यांवर लवकरच निर्णय निर्णय होईल असे सांगितले होते.

दरम्यान शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा रखडला होता. यावरूनच विरोधक सुद्धा यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत होते. दरम्यान शिंदे गटाचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा असाच रखडला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – काँग्रेसच्या तारणहार! पंतप्रधानपद नाकारून सोनिया गांधींनी सांभाळली होती पक्षाची कमान

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -