घरताज्या घडामोडीशिंदे गट आक्रमक; 'जोडे-मारो आंदोलन' करत नोंदवला राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध

शिंदे गट आक्रमक; ‘जोडे-मारो आंदोलन’ करत नोंदवला राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध

Subscribe

नाशिक : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत आहे. याच दरम्यान त्यांच्या टप्प्याटप्प्यावर सभाही संपन्न होत आहे. अशीच त्यांची एक सभा वाशिम येथेही झाली आणि याच सभेत राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात नवा वाद उभा राहिला आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी टिकात्मक वक्तव्य केल्याने वादंग निर्माण झाला आहे. सत्ताधारी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासह मनसे राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन करत निषेध नोंदवला.

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच दरम्यान, वाशिम येथील सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत बोलताना ‘सावरकर हे इंग्रजांचे एजंट होते, त्यांनी इंग्रजाकडे माफी मागून त्यांच्याकडून सुविधा मिळवून घेतल्या’ अश्या पद्धतीचे वक्तव्य केल्याने राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्येही बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गंजमाळ येथील पक्षाच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर राहुल गांधी यांच्या स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. त्याचसोबत राहुल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान यावेळी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर, महिला अध्यक्ष लक्ष्मी ताठे, मामा ठाकरे, पुजा तेलंग, अक्षय कलंत्री आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -