Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र BMC Election : भाजपच्या 'मिशन 150'मध्ये शिंदे गटाचाही समावेश? दीपक केसरकरही संभ्रमात

BMC Election : भाजपच्या ‘मिशन 150’मध्ये शिंदे गटाचाही समावेश? दीपक केसरकरही संभ्रमात

Subscribe

आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'मिशन 150' चा नारा देण्यात आलेला आहे. पण यामध्ये शिवसेनेचा म्हणजेच शिंदे गटाचा समावेश आहे की नाही, याबाबत स्पष्टता होऊ शकलेली नाही. पण भाजपच्या मिशन 150 वर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे शिवसेनेमध्ये सुद्धा याबाबत संभ्रम असल्याचे समोर आले आहे.

सध्या राज्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपांवरून अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये देखील जागा वाटपांबाबत स्पष्ट चर्चा झालेली नाही. त्यामुळे आता तरी आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ‘मिशन 150’ चा नारा देण्यात आलेला आहे. पण यामध्ये शिवसेनेचा म्हणजेच शिंदे गटाचा समावेश आहे की नाही, याबाबत स्पष्टता होऊ शकलेली नाही. पण भाजपच्या मिशन 150 वर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे शिवसेनेमध्ये सुद्धा याबाबत संभ्रम असल्याचे समोर आले आहे. पत्रकारांशी संवाद साधला असता, केसरकर यांनी याबाबत वक्तव्ये केले. तसेच त्यांनी यावेळी ठाकरे गटावर देखील जोरदार हल्ला चढवला. (Shinde group also included in BJP’s ‘Mission 150’? Deepak Kesarkar is also confused)

हेही वाचा – अजित पवार अन् जयंत पाटील वाद? असंतोषाचे पाणी मुरत असल्याची चर्चा

- Advertisement -

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मिशन 150 च्या नाऱ्याबाबत बोलताना म्हणाले की, भाजपच मिशन 150 हे आम्हाला धरून असेल. त्यामुळे त्यांच्या असेल या वक्तव्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तर युतीमध्ये जागा वाटपावरून आणि जागा विजयी होण्यावरून एकमत नसल्याचे या वक्तव्याच्या माध्यमातून समोर आले आहे.

तर, उद्धव ठाकरेंसोबत आता कोणी राहीलं नाही, जे उरलेत त्यांना खोटं सांगून थांबवलं आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आहारी गेले आहेत. त्यांना दर आठ दिवसांनी सिल्वर ओकच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अडीच वर्षात काय केलं हे सांगावे असा प्रश्न उपस्थित करत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

नुकतीच आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेसने जागा वाटपांवर चर्चा केल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले. तर जागावाटपाबाबत माहिती देताना नाना पटोले यांनी सांगितले की, महाराष्ट्रात भाजपला परास्थ करणं, मेरीटच्या आधारावर निर्णय होण ही आमची भूमिका आहे. त्यामुळे सगळ्या जागेची चर्चा येणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत व्हावी. तसेच, जागा कोणाला जास्त मिळतात? कमी मिळतात याबाबत चर्चा नाही तर जो जिंकून येऊ शकेल. त्या पद्धतीची तयारी करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे, असेही नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -