घरमहाराष्ट्रआधी २४० जागा लढण्याचा दावा; मग शिंदे गट आक्रमक होताच बावनकुळेंची सारवासारव

आधी २४० जागा लढण्याचा दावा; मग शिंदे गट आक्रमक होताच बावनकुळेंची सारवासारव

Subscribe

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या खासगी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदेंकडे फक्त ५० आमदार असल्याने आपण २४० जागा लढवणार असे वक्तव्य केले होते. ज्यामुळे शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. पण आता या विधानावरून पलटी मारत बावनकुळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाल्यानंतर सुद्धा या दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये छोटी का असेना कुरबुर पाहायला मिळत असते. बाहेरून या दोन्ही पक्षांचे नाते कितीही चांगले असले तरी या दोन्ही पक्षांमधील अंतर्गत वाद बाहेर येतच असतो. नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे शिंदे गट चांगलात आक्रमक झालेला पाहायला मिळाला. ज्यानंतर आता बावनकुळे यांच्याकडून त्यांनी केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात म्हंटले आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या एका खासगी कार्यक्रमात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्या कार्यक्रमात बोलताना बावनकुळे म्हणाले होते की, “२०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कमीत कमी १५०-१७० जागा जिंकण्याची तयारी करत आहोत. पण आपण जवळपास २४० जागा लढवण्याच्या तयारीत आहोत. कारण त्याठिकाणी शिंदे यांच्याकडे फक्त ५० आमदार आहेत. ५०च्या वर त्यांच्याकडे नाहीयेत. २३५-२४० जागा जर का लढल्या तर यासाठी तुम्हा सर्वांना खूप काम करावे लागणार आहे.”

- Advertisement -

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ अगदी थोड्याच वेळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ज्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी आक्रमकपणे बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पण याबाबत आता बावनकुळे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

“मी जे बोललो त्यातला केवळ अर्धाच भाग दाखवण्यात आला आहे. खरं तर शिवसेना आणि भाजप मिळून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागा लढणार आहे. आम्ही एनडीएतील सर्व घटक पक्ष मिळून या जागा लढवणार आहोत. विधानसभेची निवडणूक ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या समन्वयाने तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाईल,” असे सांगत बावनकुळे यांनी सारवासारव करत सावध पवित्र घेतला.

- Advertisement -

तर राज्यातील विधानसभेच्या 288 जागा जिंकण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. आतापर्यंत राज्यात युतीला जेवढं बहुमत मिळालं नाही, तेवढं बहुमत आम्ही मिळवणार आहोत. आम्ही तशी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. तेवढीच क्लिप व्हायरल करण्यात आली. अजून कुठलाही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. यासंदर्भात कुठलीही चर्चा सुरू झाली नसल्याचे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाबाबत वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी बाबांमुळे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अशा प्रकारची वक्तव्ये केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी त्यांना समजा द्यावी, असे मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केले होते. तर आम्ही ४८ जागा लढवायला मूर्ख आहोत काय? जागावाटपाचा अधिकार बावनकुळेंना कोणी दिला असे म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती.


हेही वाचा – पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी; बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय गायकवाडांचा संताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -