एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, गोव्यातील हॉटेलमध्ये शिंदे गटाचा झिंगाट

राज्यातील सत्ता नाट्यांतराचा खेळ आज संपला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर गोव्यातील शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी एकनाथ या गाण्यावर ठेका ठरत भन्नाट डान्स केला आहे.

आमदारांचा डान्स करत असतानाचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये सर्व आमदार एकदम जल्लोषात डान्स करताना दिसत आहेत. या हॉटेलमध्ये एक भला मोठा स्क्रीन टीव्ही दिसत आहेत. एकनाथ शिंदेंची घोषणा केल्यानंतर लगेच दुसरीकडे आमदारांनी एकच जल्लोष साजरा केला. तर काही आमदारांनी टेबलावर उभे राहून आपला आनंद साजरा केला.

फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका मांडली आहे. आतापर्यंतच्या जर राज्यातील घटना आपण पाहिल्या तर आपण विरोधी पक्षातून राज्य सरकारच्या दिशेने जात असतो. मी देखील नगरविकास मंत्री होतो आणि अन्य मंत्री म्हणून या मंत्रिमंडळात काम करत होतो. परंतु राज्याच्या, हिताच्या, भविष्याच्या आणि विकासाच्या दृष्टीने जे काही घडत होतं. काही मंत्र्यांवर झालेल्या कारवाई असतील. तसेच महाविकास आघाडीमुळे हे निर्णय घेता येत नव्हते. आम्ही बाळासाहेबांची वैचारीक भूमिका पुढे घेऊन जातोय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : कोण आहेत? महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; जाणून घ्या एका क्लिकवर