शिंदे गटात येण्यासाठी तब्बल ५० कोटींची ऑफर, शिवसेना आमदाराचा मोठा खुलासा

maharashtra Chief Minister Eknath shinde today Delhi visit meet pm modi and amit shah

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील आज शिंदे गटात सामील झाले आहे. मात्र, एक धक्कादायक खुलासा शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयाने केला आहे. शिंदे गटात येण्यासाठी तब्बल ५० कोटींची ऑफर असल्याचा खुलासा शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे.

उदयसिंग राजपूत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ५० कोटींच्या ऑफरचा दावा केल्यानंतर दोन चारचाकीवरून फुटेज असल्याचा दावा देखील आमदार राजपूत यांनी केला आहे. १०० कोटी दिले तरीही सेनेसोबत गद्दारी करणार नाही, असं वक्तव्य औरंगाबादच्या आमदारांनी केलं आबे. त्यामुळे शिवसेनाविरोधातील बंडाला आता एक नव आणि वेगळंच वळण लागणार असल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण देशाचे लक्ष राज्याकडे लागले आहे. शिंदे गटातील नेत्यांना आता केंद्रानेही सुरक्षा पुरवली आहे. राज्यपाल कोश्यारी यांना आता डिस्चार्ज मिळल्याने सर्व यंत्रणा आता हालणार असल्याची चर्चा आहे. तसेच शिंदे गटातून पाठिंब्याचं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे दिलं जाणार का, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला होता. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा अजित पवारांना जी ऑफर देण्यात आली होती. तीच ऑफर आता शिंदे गटाला देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना आमदारांचा वाढता पाठिंबा पाहता भाजपकडून मोठी ऑफर देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर, बंडखोर आमदारांमध्ये खलबतं सुरु