घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदे गटातील या मंत्र्याची तब्येत बिघडली, उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल

एकनाथ शिंदे गटातील या मंत्र्याची तब्येत बिघडली, उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल

Subscribe

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार सोहळा नुकताच पार पडला. आज या सरकारची खातेवाटपासंदर्भात बैठक होणार आहे. मात्र बैठकीआधीच शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या शिंदे गटातील 9 आमदारांपैकी तानाजी सावंत एक आहेत. खातेवाटपाच्या बैठकीआधी आज ते पुणे दौऱ्यावर होते. मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्याने तानाजी सावंत यांनी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे सावंत आजच्या खाते वाटपासंदर्भातील बैठकीला गैरहजर राहणार आहेत.

- Advertisement -

अखेर 39 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र विस्तारानंतर दोन दिवस उलटून गेले तरी खाते वाटप झाले नाही, त्यामुळे कोणत्या मंत्र्याला कोणते खाते दिले जाणार यावरून चर्चा रंगत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यात प्रत्येक मंत्र्याला दोन ते तीन खात्यांचा पर्याय विचारण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह आता राज्यात 20 मंत्री आहेत. मंगळवारी भाजपच्या 9 आणि एकनाथ शिंदेंच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि सुरेश खाडे यांनी शपथ घेतली, तर शिंदेंकडून संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, दीपक केसरकर, दादा भुसे आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदावर वर्णी लागली.


गद्दारी करणं शिंदे गटाची प्रायव्हेट प्रॉपर्टी, प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -