घरताज्या घडामोडी'नटी' म्हणून उल्लेख, सुषमा अंधारेंवर टीका करताना गुलाबराव पाटलांनी पातळी सोडली

‘नटी’ म्हणून उल्लेख, सुषमा अंधारेंवर टीका करताना गुलाबराव पाटलांनी पातळी सोडली

Subscribe

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात सभा आयोजित केली होती. परंतु पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. त्यामुळे सुषमा अंधारेंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेत शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात सभा आयोजित केली होती. परंतु पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. त्यामुळे सुषमा अंधारेंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेत शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली. सुषमा अंधारेंच्या या टीकेनंतर मंत्री गुलाबराव पाटलांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. “ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणले”, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.

गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

- Advertisement -

“मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणले. सुषमा अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे” असा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांच्यावर केला. तसेच सुषमा अंधारेंना मुंबई महापालिकेसाठी लाडू दिलेला आहे म्हणून त्या फिरत असल्याची टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. शिवसेनेत फुट पडण्याला मी जबाबदार असल्याच्या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी टीका केली. “मूळ चुका या त्यांच्या असताना आम्हाला गद्दार म्हटले जाते. आम्ही गद्दार नव्हतोच. आम्हाला यांनी समजूनच घेतले नाही. राज्यात आज फिरताहेत, आपण मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहात, आणि बाळासाहेबांचे नातू आहात. त्यामुळे फिरल्यामुळे, काही ना काही नाराजी या दूर होतील. समस्या दूर होतील असे वाटले होते. पण गाढवांच्या पुढे वाचली गाथा आता रात्रीचा गोंधळ बराच होता असे म्हणत एखाद्या माणसाने सांगावं आणि इतरांनी ते ऐकूच नये. याबद्दल मी आदित्य ठाकरे यांना गाढव म्हणणार नाही. त्यांनी आमच्या समोर वाचले पण आम्ही गाढव होतो का काय. त्यांनी आता कबुली दिली मात्र वेळ निघून गेली आहे”, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपाचे राज्य आल्यापासून धर्माचे राज्य व देशावर देवाची कृपा झाल्याचा प्रचार; सामनाच्या ‘रोखठोक’मधून निशाणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -